Ekana Cricket Stadium Lucknow (Photo Credit - Twitter)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला जाणार आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. मुंबईने तीन सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवला आहे, तर, लखनौ संघालाही आतापर्यंत तीन पैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

खेळपट्टी अहवाल (Ekana Cricket Stadium Pitch Report)

टाटा आयपीएल 2025 चा 16 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लखनौमध्ये खेळला जाईल. एकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीची बनलेली आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना खूप मदत मिळते. गेल्या हंगामात या मैदानावर कमी धावसंख्या असलेले सामने खेळवण्यात आले होते. सुरुवातीला, हे मैदान वेगवान गोलंदाजांनाही मदत करते, परंतु जसजसा वेळ जातो तसतसे फिरकीपटू वर्चस्व गाजवू लागतात. (हे देखील वाचा: LSG vs MI Head to Head: मुंबई आणि लखनौ संघाच्या हेड टू हेड आकडेवारीत कोण आहे वरचढ? वाचा एका क्लिकवर)

नाणेफेक ठरणार महत्वाची

या मैदानावर पहिल्या डावात सरासरी 165 धावा आहेत. अशा परिस्थितीत या मैदानावर बॅट आणि बॉलमध्ये जोरदार लढत पाहायला मिळते. या स्टेडियममध्ये आतापर्यंत 15 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. या काळात, या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 7 सामने जिंकले आहेत आणि नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनीही 7 सामने जिंकले आहेत. दरम्यान, एका सामन्यात निकाल लागलेला नाही. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

लखनौ सुपर जायंट्स: मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, दिग्वेश सिंग राठी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिश्नोई.

मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, विघ्नेश पुथूर.