LSG vs MI (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला गेला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव करत या हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. त्याआधी, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 5 गडी गमावून 191 धावा करु शकला.

मिचेल मार्शची 60 धावांची स्फोटक खेळी

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. लखनौकडून मिचेल मार्शने 60 धावांची शानदार खेळी केली. त्याने 31 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्याशिवाय एडेन मार्क्रमने 50 आणि आयुष बदोनीने 30 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजीत कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

हे देखील वाचा: LSG vs MI, IPL 2025 16th Match: रोहित शर्मा लखनौ विरुद्धचा सामना का खेळत नाहीये? कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले मोठे कारण

सूर्यकुमार यादवची अर्धशतकी खेळी वाया

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकांत पाच गडी गमावून फक्त 191 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्ससाठी, घातक फलंदाज सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवने 43 चेंडूत नऊ चौकार आणि एक षटकार मारला. सूर्यकुमार यादवशिवाय नमन धीरने 46 धावा केल्या. त्याच वेळी, लखनौ सुपर जायंट्सकडून आकाश दीप, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.