
Lucknow Super Giants vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) चा 16 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) येथे खेळवला जात आहे. या हंगामात, लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) करत आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर आहे. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने मुबंईसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Fifties from Mitchell Marsh and Aiden Markram propel LSG to a massive total of 203/8 at the Ekana Stadium 💙⚡
Can MI chase down this big target? 🤔#LSGvMI #MitchellMarsh #IPL2025 #Sportskeeda pic.twitter.com/Xrsz5WzPoW
— Sportskeeda (@Sportskeeda) April 4, 2025
मिचेल मार्शची 60 धावांची स्फोटक खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या आहे. लखनौकडून मिचेल मार्शने 60 धावांची शानदार खेळी केली. त्याने 31 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्याशिवाय एडेन मार्क्रमने 50 आणि आयुष बदोनीने 30 धावांचे योगदान दिले. (हे देखील वाचा: LSG vs MI, IPL 2025 16th Match: रोहित शर्मा लखनौ विरुद्धचा सामना का खेळत नाहीये? कर्णधार हार्दिक पांड्याने सांगितले मोठे कारण)
हार्दिक पांड्याने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट
दुसरीकडे, युवा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने मुंबई इंडियन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. मुंबई इंडियन्स संघाकडून गोलंदाजीत कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 5 गडी बाद केले. त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार आणि विघ्नेश पुथूर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.