शाओमी (Xiaomi) कंपनी येत्या 11 जूनला भारतात त्यांचा पहिला लॅपटॉप Mi Notebook लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एमआय नोटबुक हा लॅपटॉप पातळ बेजल्स आणि हाय स्क्रिन टू बॉडी रेशिओस येणार आहे. या लॅपटॉप संदर्भात शाओमी कंपनीने एक टीझर झळकवत असा दावा केला आहे की, नोटबुकमध्ये 12 तासांचा बॅटरी बॅकअप असणार आहे. या नोटबुकच्या माध्यमातून शाओमी कंपनी भारतातील Acer, Asus, Dell, HP आणि Lenovo सारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी त्यांचा पहिला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.
कंपनीने ट्वीटरवर एक 7 सेकंदाचा व्हिडिओ टीझर शेअर केला आहे. त्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, Mi नोटबुकमध्ये 12 तासांचा बॅटरी बॅकअप असणार आहे. ट्वीटसह कंपनीने असे ही म्हटले आहे की, सारखे सारखे चार्जरच्या पाठी धावण्याची काहीच गरज नाही आहे. Mi च्या चाहत्यांना लवकरच #MiNoteBook च्या बॅटरी लाईफचा अंदाच येणार आहे. तर Apple आणि Dell कंपनीच्या लॅपटॉपमध्ये यापूर्वी पासूनच 12 तासांची बॅटरी बॅकअप सेटअप देण्यात आला आहे.(Realme Smart TV लॉन्च, किंमत फक्त 12,999 रुपयांपासून सुरु)
#MakeEpicHappen without running🏃♂️for a charger🔌 every now and then.
Mi fans, guess the #Epic Battery Life on the upcoming #MiNoteBook. 💻
Global Debut on June 1⃣1⃣. pic.twitter.com/GlSMXb2154
— Mi India (@XiaomiIndia) June 4, 2020
शाओमी कंपनी भारतात स्वस्त किंमती मधील स्मार्टफोन लॉन्च करणारी मानली जाते. गेल्या महिन्यात Mi10 सह ही परंपरता तोडली गेल्याचे दिसून आले. कारण Mi10 स्मार्टफोनची कंपनीने किंमत तब्बल 49,999 रुपये ठेवत लॉन्च केला. मात्र आता कंपनी Mi Notebook साठी काय किंमत ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत MacBookAir मॉडेल्सला Mi Notebook टक्कर देणार का हे सुद्धा पहाणे महत्वाचे असणार आहे. लॅपटॉपमध्ये 10th Generation Intel प्रोसेसर दिला जाणार आहे.