Realme Smart TV लॉन्च, किंमत फक्त 12,999 रुपयांपासून सुरु
Realme Smart Tv (Photo Credits-Twitter)

रिअलमी (Realme) कंपनीने अखेर त्यांचा स्मार्ट टेलिव्हिजन लॉन्च केला आहे. रिअलमी स्मार्ट टीव्हीसह कंपनीने अन्य 3 प्रोडक्ट्स रिलअमी बड्स एअर नियो, रिअलमी वॉच आणि रिलअमली पावरबँक 3 सुद्धा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. रिअमली स्मार्ट टीव्ही अंतर्गत कंपनीने 43 इंच Full HD आणि 32 इंचाचा असे दोन HD रेडी मॉडेल्स लॉन्च केले आहेत. टीव्ही बाबत बोलायचे झाल्यास त्यामध्ये क्रोमा बुस्ट पिक्चर इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच Picture Quality अधिक उत्तम दिसणार आहे. टीव्हीसाठी देण्यात आलेला ब्रायटनेस, रंग, कॉन्ट्रास्ट सुधारण्याचा सुद्धा दावा कंपनीने केला आहे. रिअलमी स्मार्ट टीव्ही बेजल लेस डिझाइनसह येणार आहे. त्याची जाडी 8.7 मिलीमीटर आणि त्यामध्ये एज-टू-एज पॅनल कव्हर लेअर देण्यात आली आहे.

>>Realme TV किंमत:

रिअलमी स्मार्ट टीव्ही 32 इंचाची किंमत 12,999 रुपये आहे. तर 43 इंचाचा Full HD स्मार्ट टीव्हीसाठी ग्राहकांना 21,999 रुपये मोजावे लागणार आहेत. या दोन्ही स्मार्ट टीव्हीची खरेदी तुम्हाला फ्लिपकार्ट आणि Realme.com येथे करता येणार आहे. परंतु जून महिन्यापासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

>>Realme TV फिचर्स:

रिअलमी 43 इंचाच्या मॉडेलमध्ये (1920 x 1080 पिक्सल) फुल एचडी डिस्प्ले आणि 178 डिग्री व्यु अँगल, एचडीआर 10 देण्यात आला आहे. तसेच 32 इंचाच्या टीव्हीमध्ये (1366 x 768 पिक्सल) एचडी डिस्प्ले असून त्याचा व्यु अँगल 178 डिग्री आहे.(10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे धमाकेदार स्मार्टफोन; दिग्गज कंपन्यांचाही यात समावेश)

रिअलमीच्या दोन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये स्टँडर्ड, विविड, स्पोर्ट्स, मुव्ही, गेम आणि एनर्जी सेविंग सारखे 7 डिस्प्ले मोड देण्यात आले आहेत. तसेच 1.1 गीगाहर्ट्ज क्वाड-कोर कॉर्टेक्स ए53 मीडियाटेक प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी माली-479 एपमी3 जीपीयू आहे. रॅम 1 जीबी तर स्टोरेज 8 जीबी देण्यात आला आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या या दोन नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना अँन्ड्रॉइड 9.0, नेटफ्लिक्स, युट्युब, प्राइम व्हिडिओ आणि लाईव्ह चॅनल सारखे अॅप मिळणार आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी Wifi 802.11 B/G/N, ब्लुटुथ 3, 3 एचडीएमआय, 2 युएसबी, ईदरनेट सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीच्या आवाजासाठी 12 वॅटचे 2 स्पीकर्स देण्यात आले आहेत. डॉल्बी ऑडिओ MS12B सुद्धा आवाज अधिक उत्तम येण्यास मदत करणार आहे.