Xiaomi Redmi Note 10 Lite (Photo Credits: Xiaomi India)

शाओमी इंडिया (Xiaomi India) ने भारतात रेडमी नोट 10 लाईट (Redmi Note 10 Lite) लॉन्च केला आहे. मागील वर्षी देशात लॉन्च झालेल्या रेडमी नोट 9 प्रो (Redmi Note 9 Pro) ला संपूर्ण रीबॅज्ड करून हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. नवीन लॉन्च झालेला हा स्मार्टफोन 2 ऑक्टोबर 2021 रोजी mi.com आणि Amazon India च्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे (SBI Credit Card) खरेदी केल्यास 1,250 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल.

पंच-होल डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G एसओसी प्रोसेसर हे या फोनचे मुख्य आकर्षण आहे. यात क्वाड-कॅमेरा सेटअप दिला असून 48 MP चा प्रायमरी शूटर दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,020 mAh ची बॅटरी 18W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

भारतात Redmi Note 10 Lite 4GB+64GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. तर 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. टॉप-एंड 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन अरोरा ब्लू, शॅम्पेन गोल्ड, ग्लेशियर व्हाईट आणि इंटरस्टेलर ब्लॅक या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. (Xiaomi Redmi Note 7Pro स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट, फोन चार्जिंग करताना 'या' गोष्टीची घ्या काळजी)

Redmi Note 10 Lite मध्ये 6.67- इंचचा FHD+ IPS डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 1080x2400 पिक्सेल रिजोल्यूशन दिले आहे. यात ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G SOC प्रोसेसर असून 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे.

फोटो आणि व्हिडिओसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्ससह 48MP शूटर, 5MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16MP फ्रंट कॅमेरा आहे. सिक्युरिटीसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक हे फिचर्स देखील देण्यात आले आहेत.