Xiaomi Redmi 9 Prime आज दुपारी 12 वाजता Amazon होणार सेल, जबरदस्त कॅमे-यासह 'ही' आहेत या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये
Xiaomi Redmi 9 Prime (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपला नवा स्मार्टफोन Xiaomi Redmi 9 Prime चा आज भारतात सेल ठेवला आहे. ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेजॉन इंडिया (Amazon India) आणि अधिकृत साइट Mi.com या स्मार्टफोनचा सेल होणार आहे. ऑनलाईन सोबत ऑफलाईन पद्धतीने देखील या स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. Mi Home stores, और Mi Studio Stores वरही विक्रीसाठी उपलब्ध होईल. जबरदस्त कॅमेरा फिचर्स आणि बॅटरी लाईफ असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

हा स्मार्टफोन 2 वेरियंटमध्ये उपलब्ध करण्या आला आहे. यात 4GB + 64GB वेरियंटची किंमत 9,999 रुपये तर 4GB + 128GB वेरियंटची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अमेजॉनवरुन Xiaomi Redmi 9 Prime खरेदी करणा-या City Bank ग्राहकांना 5% अतिरिक्त डिस्काउंट मिळणार आहे. Xiaomi चा लेटेस्ट स्मार्टफोन Redmi Note 9 Pro साठी आज सेल, ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 6.53 इंचाची फुल एचडी डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात ऑक्टा कोर मिडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात देण्यात आलेले स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने तुम्ही वाढवूही शकता.

Xiaomi Redmi 9 Prime मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइट कॅमेरा, 5MP चा मॅक्रो शूट आणि 2MP चा डेप्थ सेंसर आहे. तसेच चार्जिंगसाठी 5020mAh ची बॅटरी देणायत आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसह येते. त्याचबरोबर 10 वॉटचा चार्जर देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचे झाले तर, यात Bluetooth 5.0, Wi-Fi Direct, FM Radio, NFC, GPS, AGPS आणि इंफ्रारेड सेंसर आहे. फोनमध्ये रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे.