Redmi 8 येत्या 9 ऑक्टोंबरला भारतात होणार लॉन्च, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स
Xiaomi Redmi 8 Smartphone (Photo Credits: Twitter)

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi) येत्या 9 ऑक्टोंबरला त्यांचा नवा फोन लॉन्च करणार आहे. याबाबत शाओमी इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी एक ट्वीट करत असे म्हटले आहे की, रेडमी 8 लॉन्च करण्यात येणार आहे. रेडमी 8 च्या लॉन्च टीझरवरुन असे समजते आहे की, या स्मार्टफोनसाठी मोठी बॅटरी देण्यात येणार आहे.

कंपनीने भारतात नुकताच रेडमी 8A लॉन्च केला आहे. त्यावेळच्या लाइव्ह स्ट्रिमिंग दरम्यान मनु जैन यांनी रेडमी 8 स्मार्टफोनची पहिली झलक दाखवली होती. रिपोर्टच्या मते या स्मार्टफोनला 4000mAh ची बॅटरी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. तर डिस्प्लेसाठी वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच दिला जाणार आहे. तसेच USB Type C देण्याची शक्यता आहे. कारण रेडमी 8A मध्ये ही या पद्धतीची युएसबी दिली आहे.रिपोर्टनुसार, स्मार्टफोनच्या टॉप वेरियंटमध्ये 8GB पर्यंतचा रॅम दिला जाऊ शकतो. रेडमी 8 मध्ये Android 9 Pie बेस्ड MIUI 10 दिला जाणार असून सिंगल फ्रंट कॅमेरा असणार आहे.(Amazon Great Indian Festival: अॅमेझॉनच्या या बंपर सेल मध्ये गॅजेट्ससह अन्य वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट, 29 ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार हा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल')

तसेच शाओमी कंपनीने यंदाच्या दिवाळीसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. तर शाओमीच्या सेलला Diwali With Mi असे नाव देण्यात आले आहे. येत्या 28 सप्टेंबर पासून हा सेल सुरु होणार असून 4 ऑक्टोंबर पर्यंत सुरु राहणार आहे. शाओमीच्या या सेलमध्ये ग्राहकांसाठी 1 रुपयांचा फ्लॅश सेल सुद्धा सुरु होणार आहे