Amazon Great Indian Festival: अॅमेझॉनच्या या बंपर सेल मध्ये गॅजेट्ससह अन्य वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट, 29 ते 4 सप्टेंबर पर्यंत असणार हा 'ग्रेट इंडियन फेस्टिवल'
Amazon Great Indian Sale (Photo credits: Amazon)

नवरात्री आणि त्या पाठोपाठ येणा-या सणांनिमित्त मनसोक्त शॉपिंग करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर (Amazon) 'ग्रेट इंडियन फेस्टिवल' (Great Indian Sale) सेल आयोजित करण्यात आला आहे. यात मोबाईल्स (Mobiles), कॅमेरा (Cameras) या गॅजेट्ससह घरगुती उपकरणे आणि फॅशन संबंधित वस्तूंवर आकर्षक सूट मिळणार आहे. या सेलमध्ये SBIच्या डेबिट तसेच क्रेडिट कार्ड धारकांना त्वरित अतिरिक्त 10% सूट मिळणार आहे. तसेच बोनस ऑफरही मिळणार आहे. यात मोबाईल्स Upto 40% सूट मिळणार असून फॅशन आणि त्या संबंधी लागणा-या अॅसेसरिजवर अतिरिक्त 90% सूट मिळणर आहे

तसेच टीव्ही (TV), एसी (Air Conditioners), रेफ्रिजरेटर (Refrigerator) यांसारख्या उपकरणांवर Upto 75% सूट मिळणार असून Kindle, Echo आणि Fire TV वर 45% सूट मिळणार आहे. या सेलमध्ये मिळणा-या आकर्षक स्मार्टफोन्स:

1. Oneplus 7 Pro

2. iPhone XR

3. Samsung Galaxy Note 9

4. Redmi 7

5. Xiaomi Mi A3

6. Oppo K3

हेही वाचा- Flipkart 'The Big Billion Days Sale': 29 ते 4 ऑक्टोबरला असणार फ्लिपकार्टचा मेगा सेल, गॅजेट्ससह घरगुती वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट

या स्मार्टफोन्ससह अन्य ब-याच स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळणार आहे. तसेच Sanyo Kaizen 32 Inch HD, TCL (65) 4K UHD अॅनड्रॉईड, LG (43) 4K UHD स्मार्ट यांसारख्या ब-याच स्मार्ट टिव्हींवर आकर्षक ऑफर्स मिळणार आहे.

अॅमेझॉनच्या प्राईम सदस्यांसाठी ही ऑफर 28 सप्टेंबरलाच रात्री सुरू होणार आहे. तसेच तुमच्या पहिल्या ऑर्डरवर तुम्हाला मोफत डिलिवरी मिळणार आहे. या सेलमध्ये सौंदर्यप्रसाधने, कपडे यांसारख्या फॅशनशी संबंधित वस्तूंवरही विशेष सूट मिळणार आहे. तसेच लहान मुलांच्या वस्तू तसेच कपड्यांवरही विशेष सूट मिळणार आहे.