Mi10 Smartphone Launched (Photo Credits-Twitter)

शाओमी कंपनीने भारतात 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या एक धमाकेदार स्मार्टफोन Mi10 5G आज लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये फक्त कॅमेराच नाही तर 3D कर्व्ड डिस्प्ले आणि लेटेस्ट क्वालकॉम प्रोसेसर सुद्धा दिला असून जो त्यााला अधिक पावरफूल बनवण्यास मदत करणारा ठरणार आहे. एमआय 10 स्मार्टफोनला कंपनीने 5G कनेक्टिव्हिटी सपोर्टसह लॉन्च केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्चिंगचे ऑनलाईन पद्धतीने लाईव्ह सुद्धा झळकवले होते. या ऑनलाईन इव्हेंट मध्ये कंपनीने त्याची किंमत आणि फिचर्स बाबत सु्द्धा अधिक खुलासा केला आहे. शाओमी कंपनीकडून या स्मार्टफोनसह एक वायरलेस चार्जर सुद्धा लॉन्च केले आहे.

भारतात एमआय 10 दोन स्टोरेज वेरियंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामध्ये पहिला 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरज असणाऱ्या मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. या स्मार्टफोसाठी प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कंपनीकडून 2,500 रुपयांचा 30W वायरलेस चार्जर फ्री देण्यात येणार आहे. तसेच नो-कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर्स सुद्धा या स्मार्टफोनसह देण्यात येणार आहे.(रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म मध्ये अमेरिकन Vista Equity Partners ची गुंतवणूक; 11,367 कोटी रूपयांचा व्यवहार)

स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटिंग असणारा E3 AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच 3D कर्व्ड 6.67 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 फ्लॅगशिफ प्रोसेसर ही त्यात असणार आहे. त्याचसोबत 5G प्रोसेसर ही असणार आहे. फोनध्ये USFS3.0 स्टोरेज आणि LPDDR5 रॅम देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये Pro Video Mode सुद्धा दिला आहे. त्यामुळे कॅमेऱ्यातून व्हिडिओ शूट करताना मॅन्युअल सेटिंग्स बदलता येणार आहेत. LOG व्हिडिओ प्रोसेसिंग सुद्धा फोनच्या कॅमेऱ्यात दिली आहे. Mi10 मध्ये स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये 4780mAh बॅटरी देण्यात आली असून 30W टर्बो फास्ट चार्जर सोबत येणार आहे. खासियत अशी आहे की, युजर्सला स्मार्टफोनसह 30W चा चार्जर सुद्धा दिला जाणार आहे.