Xiaomi कडून 100W वायरलेस चार्जिंग स्टँड लॉन्च, अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार फोन
Xiaomi (photo Credit: IANS/Representative Image)

शाओमीने आपला नवा Mi 100W वायरलेस चार्जिंग स्टँड लॉन्च केली आहे. कंपनीने सध्या हा चीनी मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिला आहे. मात्र लवकरच तो भारतात लॉन्च केला जाईल अशी अपेक्षा केली जात आहे. ही Mi 80W वायरलेस चार्जिंग स्टँड एक अपग्रेडेड वर्जन असून तो या वर्षाच्या मार्ट महिन्याच्या अखेरीस लॉन्च केला होता. शाओमी एमआय 100W वायरेलस चार्जिंग स्टँडची किंमत 92 डॉलर आहे. याचा पहिला सेल 16 ऑगस्ट रोजी दुपारी 10 वाजता सुरु होणार आहे.(लॉन्चिंगपूर्वी Xiaomi Redmi 10 चे स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या स्मार्टफोनच्या प्रत्येक अपडेट बद्दल अधिक)

Mi 11 Pro, Mi 11 Ultra आणि Mi MIX 4 अल्ट्रा फास्ट वायरलेस चार्जिंग मोडसह येणार आहे. हा अधिकतम 67W आणि 50W चार्जिंग सपोर्ट करणार आहे. शाओमीने दावा केला आहे की, Mi MIX 4 स्मार्टफोनची 4500mAh ची बॅटरी 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टच्या मदतीने 28 मिनिटात फुल चार्ज केला जाऊ शकणार आहे.

नवा Mi 100W वायरलेस चार्जिंग स्टँड जुन्या Mi 80W वायरलेस चार्जिंग स्टँड प्रमाणे आहे. यामध्ये दोन मोठे बदल चार्जिंग स्पीड, कलर आणि सेफ्टी लेअर पहायला मिळणार आहेत. दोन्ही चार्जर डिझाइनच्या हिशोबाने एक समान आहे. या चार्जिंग स्टँडवर फोनला वर्टिकल आणि हॉरिझोंटल दोन्ही प्रकारने ठेवून चार्ज करता येणार आहे. Mi नवा वायरलेस चार्जर ब्लॅक कलरसह एक गोल्ड एसेंटसह येणार आहे. तर जुने मॉडेल व्हाइट कलर पेंट जॉबच्या सात सिल्वर एसेंट दिला आहे.(Vivo Y53s स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

नव्या चार्जरमध्ये अधिकाधिक 100W आउटपुट मिळणार आहे. बॉक्समध्ये Mi 120W चार्जर आणि एक 6A USB केबल सपोर्ट दिला जाणार आहे. Mi 100W वायरलेस चार्जिंग स्टँड मॉडेल क्रमांक MDY-13-EL सह येणार आहे. तर Mi 80W वायरलेस चार्जिंग स्टँड मॉडेल क्रमांक MDY-13-ED सह येणार आहे. सध्या वायरलेस चार्जिंग स्टँड ओवर वोल्टेड प्रोटेक्शन, अंडर वोल्टेज प्रोटेक्शन आणि ओवर टेंपरेचर प्रोटेक्शनसह येतो. यामध्ये एक ड्युअल Coil डिझाइन आणि एक डायनामिक फॅन दिला गेला आहे.