फोनचा IMEI नंबर का महत्वाचा असतो हे तुम्हाला माहिती आहे का?
फोनचा IMEI नंबर का महत्वाचा असतो हे तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credits-Edit File/Facebook)

मोबाईल फोनसाठी देण्यात येणारा IMEI क्रमांक खुप महत्वाचा असतो. मोबाईल फोन चोरी झाल्याच्या स्थितीत ग्राहकाला आयएमईआय क्रमांक माहिती असणे आवश्यक असते. खरेतर आयएमईआय क्रमांक हा पोलीस तुमचा मोबाईल हरवल्याची तक्रार केल्यानंतर देण्यास सांगतात. त्यामुळे पोलिसांना चोरी करण्यात आलेला मोबाईल ट्रॅक करण्यासाठी मदत होते. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का चोरी केलेल मोबाईल तुम्हाला सहजासहजी पुन्हा मिळत नाही? त्यामुळे पुढील काही गोष्टी या क्रमांकाबाबत जरुर लक्षात ठेवा.

- 15 अंकी Unique क्रमांक म्हणजे IMEI

इंटरनॅशनल मोबाईल एक्विपमेंट आयडेंटिटीसाठी 15 अंकी क्रमांक ग्राहकांना देण्यात येतो. तसेच प्रत्येक फोनसाठी हा क्रमांक वेगवेगळा ठेवण्यात आलेला असतो.

-सॉफ्टवेअरचा उपयोग करुन IMEI क्रमांक बदलतात

असे मानले जाते की, आयएमईआय क्रमांकमुळे फोनबाबत कोणतेही चुकीचे काम केले जात नाही. मोबाईल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅकर्स 5 मिनिटांतच चोरी केलेल्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक बदलतात

-मूळ क्रमांक ट्रेस करणे होते मुश्किल

मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या कोणत्याही ब्रँडच्या फोनचा आयईएमआय क्रमांक सहज बदलता येतो. त्यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात. आयईएमआय रिप्लेस झाल्यानंतर हा फोन नवा असल्याचे दाखवले जाते. तसेच मूळ क्रमांक ट्रेस करणे मुश्किल होऊन जाते.

-500 रुपयात बदलला जातो आयएमईआय क्रमांक

सर्वात प्रथम चोरी केल्यानंतर मोबाईलचा पॅर्टन लॉक काढून टाकला जातो. तसेच आयएमईआय क्रमांकात बदल केला जातो. त्यासाठी हॅकर्स 500 रुपये घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र हायइंड दर्जाचे स्मार्टफोनचे आयएमईआय क्रमांक बदलणे थोडे कठीण असते.

त्यामुळे मोबाईल ग्राहकांनी आपला मोबाईलचा आयएमईआयचा क्रमांक नेहमी लक्षात ठेवावा. जेणेकरुन तुमचा फोन हरवल्यास या क्रमांकाची पुष्टी करुन तो ट्रॅक करण्यास मदत होते.