व्हॉट्सअॅप हे त्याच्या युजर्ससाठी प्रत्येक वेळी खास फिचर्स आणत असते. त्यामुळे व्हॉट्सअॅप हे युजर्संच्या दिवसेंदिवस पसंदीस पडत आहे. तसेच शॉर्ट मेसेज, स्टिकर्स, व्हॉईस कॉल असे विविध फिचर्स यापूर्वी व्हॉट्सअॅपने आणले होते. त्यात आता एका नव्या फिचर्सची भर पडली असून व्हॉट्सअॅपसाठी प्रायव्हसीसाठी नवं फिचर्स 2.19.20 या बिटा व्हर्जनसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या नव्या फिचर्समध्ये व्हॉट्सअॅप अपडेट करुन त्यात सेटिंग या ऑप्शनमध्ये जाऊन अकाऊंट हे ऑप्शन निवडावे.त्यानंतर तेथे स्क्रिन लॉक असे ऑप्शन निवडुन हे नवे फिचर युजर्संना वापराता येणार आहे. तसेच आयफोनच्या iPhoneX नंतरच्या सर्व आयफोनच्या सीरिजमध्ये Face ID हे ऑप्शन दिलेले असते. तर फेस आयडीच्या माध्यमातूनही तुम्हाला हे फिचर उपलब्ध होणार आहे.
तर ऑगस्ट 2018 पासून व्हॉट्सअॅपने ग्रुप कॉलिंगचा पर्याय दिला आहे. मात्र ती प्रक्रिया वेळखाऊ असल्याने युजर्सना अनेक टॅब ओपन करावे लागत होते.आधी तुम्हांला व्हिडिओ कॉल सुरू करावा लागत होता. त्यानंतर कॉल कनेक्ट झाल्यावर तुम्हांला इतर मित्र-मैत्रिणींना त्यामध्ये अॅड करण्याची सोय देण्यात आली आहे.