WhatsApp Status: आता व्हॉट्सऍप स्टेटसवर 15 सेकंदाहून अधिक कालावधीचा व्हिडिओ पोस्ट करता येणार नाही, जाणून घ्या कारण
WhatsApp (Photo Credit: Lifewire)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रभावाचा संपूर्ण जगावर परिणाम होऊ लागला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी घरातच बसावे असे आवाहन सरकारकडून केले जात आहे. दरम्यान सोशल मीडियाचा (Social Media) अधिक वापर केला जात आहे. यामुळे इंटरनेटवर (Internet) मोठा ताण पडत आहे. यातच इंटरनेटवरील ताण कमी करण्यासाठी व्हॉट्सऍपने (WhatsApp) महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे वापरकर्त्यांना स्टेटसवर 15 सेकंदपेक्षा अधिक कालावधीचा व्हिडिओ (WhatsApp Video Status Limit) पोस्ट करता येणार नाही, अशी माहिती व्हॉट्सऍपने रविवारी दिली आहे. हे केवळ भारतातच व्हिडिओला मर्यादा ठेवण्यात आली आहे. यामुळे व्हॉट्सऍप वापरकर्त्यांमध्ये निराजनक वातावरण निर्माण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही मर्यादा काही दिवसांकरिता असून वापरकर्त्यांना पुन्हा व्हॉट्सऍपवर 15 सेकंदाहून अधिक कालावधीचा व्हिडिओ शेअर करता येणार आहे.

सध्या कोरोना विषाणूचे संकट भारतावर वावरत आहे. कोरोना विषाणुवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात 21 दिवासांची संचारबंदी लागू केली आहे. यामुळे देशभरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण कार्यलय बंद आहेत. दरम्यान, प्रत्येकजण सोशलमीडियाचा अधिक वापर करू लागले आहेत. परिणामी, इंटरनेटवर मोठा ताण पडत असल्याची माहिती समोर आली. इंटरनेटवरील ताण कमी करण्यासाठी व्हॉट्सअपने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी व्हॉट्सऍप वापरकर्त्यांना 30 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ स्टेटसवर पोस्ट करता येत होता. यात व्हॉट्सऍपने बदल केला आहे. आता यापुढे व्हॉट्सऍपवर 15 सेकंदाहून अधिक कालावधीचा व्हिडिओ शेअर करता येणार नाही, अशी माहिती दिली आहे. परंतु, ही मर्यादा केवळ काही काळासाठीच मर्यादीत असणार आहे, असेही माहिती व्हॉट्सऍपने आपल्या वापरकर्त्यांना दिली आहे. हे देखील वाचा- Google 3D Animals: 'या' Android आणि iOS स्मार्टफोन मध्ये Panda, Tiger, Lion, Shark, Penguin पाहू शकाल अगदी तुमच्या जवळ!

व्हॉट्सऍपने दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटवरील ताण कमी करण्यासाठी ही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय केवळ मर्यादीत काळासाठीच मर्यादीत आहे. देशावरील कोरोना विषाणुचे संकट दूर होताच, कंपनी पुन्हा एकदा व्हिडिओची मर्यादा वाढवेल असेही कंपनीने सांगितले आहे.