व्हॉट्सअॅपने (WhatsApp) युजर्ससाठी एक नवे भन्नाट फिचर रोलआउट केले आहे. कंपनीने बहुप्रतीक्षित QR कोड सपोर्ट फिचर लॉन्च केले आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरमुळे युजर्सला नवे कॉन्टेक्ट्स अॅड करता येणार आहेत. हे फिचर इन्स्टाग्रामवरील नेमटॅग फिचर सारखेच काम करणार आहे. कंपनी हे फिचर सध्या iPhone युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहे. बीट वर्जनसाठी रोलआउट करण्यात आलेल्या या फिचरचे स्टेबल वर्जन लवकरच रिलिज करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपवरील या नव्या फिचरबाबत अधिक माहिती देत WABetaInfo यांनी असे म्हटले आहे की, अॅन्ड्रॉइड डिव्हाइससाठी हे फिचर लवकरच दिले जाणार आहे.
WABetaInfo यांनी या फिचर संबंधातील काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये युजर्सला QR कोड फिचर व्हॉट्सअॅपच्या DP च्या येथे असलेल्या नावाच्या बाजूला आणि सेटिंग्सच्या आतमध्ये देण्यात आलेल्या स्टेटस ऑप्शन मध्ये दिसणार आहे. जेव्हा युजर आयकॉनवर क्लिक करेल त्यावेली त्यांना QR कोड दाखवला जाणार आहे. या QR कोडला मित्रमैत्रींचा क्रमांक अॅड करण्यासाठी वापरता येणार आहे.(मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी WhatsApp देणार वॉर्निंग, युजर्ससाठी नवे फिचर लवकरच रोलआउट करणार)
✅ WhatsApp is rolling out the QR Code support for iOS beta users TODAY!https://t.co/DHaaVLSLEk
Read the article to discover if the feature is already available for your WhatsApp account.
— WABetaInfo (@WABetaInfo) May 21, 2020
रोलआउट झाल्यानंतर हे फिचर व्हॉट्सअॅप मधील शेअर कॉन्टेक्ट फिचरसह जोडण्यात येणार आहे. सध्या युजर्सला कॉन्टेक्ट शेअर करण्यासाटी चॅट्स येथे अटॅचमेंटचा ऑप्शन दिला जात आहे. नव्या फिचरमुळे याचा फायदा युजर्सला नक्की होईल अशी अपेक्षा केली जात आहे. क्यूआर कोड बिझनेस युजर्ससाठी कामी येईल असे मानले जात आहे. व्हॉट्सअॅप आधीपासूनच क्यूआर कोड टेक्नॉनलॉजीचा वापर करत आहे. अॅप डेस्कटॉप ब्राउजरसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधा देतो. काही रिपोर्ट्सनुसार व्हॉट्सअॅपचे हे फिचर मोडिफाय केले जाण्याची शक्यता आहे.