WhatsApp And Instagram Down: व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम ठप्प
WhatsApp and Instagram Logos (Photo Credits: Pixabay)

जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इमेज शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम (Intagram) अचानक ठप्प झाले आहेत. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या अॅपवर झालेला परिणाम दिसून येत आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजल्यापासून हे दोन्ही अॅप बंद झाले आहेत. अॅपमध्ये होणाऱ्या या गोंधळामुळे युजर्संनी ट्विटरच्या (Twitter) माध्यमातून आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. दरम्यान, फेसबुकच्या मालकीचे हे दोन्ही अॅप अचानक डाऊन झाल्याने युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंटरनेट युजर्संनी व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामच्या सेवेमध्ये झालेल्या गोंधळाबद्दल ट्विटरवर तक्रारी दाखल केल्या आहेत. अॅनरॉईड आणि आयओएस अॅपवरील 1.5 बिलियनपेक्षा अधिक युजर्स आपल्या अॅपमध्ये लॉनइन करु शकत नाहीत. (ट्वीटर वर ट्रेंड होतोय #InstagramDown; भारतासह जगभरात 'इंस्टाग्राम' ची सेवा ठप्प)

ANI Tweet:

या गोंधळाचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप टेक जाएंट फेसबुककडून घोषित करण्यात आलेले नाही. युजर्संना निर्माण झालेल्या विविध समस्या ट्विटच्या माध्यमातून पोस्ट करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अशीच समस्या युके मध्ये उद्भवली होती.