इंस्टाग्राम या लोकप्रिय फोटो शेअररिंग अॅप सध्या जगभरात ठप्प पडल्याने ट्विटरवर #InstagramDown हा हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी इंस्टाग्रामवर फोटो अपलोड नसल्याचं, स्टोरी अचानक गायब होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप इंस्टाग्रामवर या समस्येवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र भारतासह अमेरिका, युरोपमध्ये इंस्टाग्राम ठप्प झालं आहे. दर मिनिटाला सुमारे1400 जण इंस्टाग्राम ठप्प असल्याची तक्रार करत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून या समस्येबद्दल ट्वीट केलं आहे.
इंस्टाग्राम हे अॅप फेसबूकचं असून फोटो शेअर करण्यासाठी जगभर वापरलं जातं. आकर्षक फिल्टरसोबत तुम्ही इंस्टाग्रामवर फोटो शेअर करू शकता. सोबत्च लाईव्ह करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
इंस्टाग्राम डाऊन बद्दल ट्वीटर वरील प्रतिक्रिया
Rom pom pom pom rom pom pom pom #instagramdown pic.twitter.com/ehMk3SXmcF
— O ENXERIDO (@EnxeridoO) October 30, 2019
ट्वीट
Instagrammers having a melt down #instagramdown pic.twitter.com/OfSt8qYjvl
— Zupho (@zupho24) October 30, 2019
ट्वीट
At this point Instagram stay down more than up🤔🤷🏾♀️ #instagramdown pic.twitter.com/cqkGQC2mqe
— MyRealitytv (@RealitytvMy) October 30, 2019
ट्वीट
I reset my wifi thinking that there’s something wrong with my connection but only to realize that Instagram is down #instagramdown pic.twitter.com/EXjrG5ig5y
— Rebecca bakangil (@RebeccaBakangil) October 30, 2019
काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे Facebook, Instagram आणि WhatsApp अशा तिन्ही सेवा एकाचवेळी ठप्प पडल्याने युजर्सनी नाराजी व्यक्त केली होती. जगभरात करोडो युजर्स एकाच वेळी इंस्टाग्राम सारखी अॅप वापरत असल्याने त्यांना काही मिनिटांसाठीदेखील सेवा बंद ठेवणं हे मोठं आर्थिक नुकसान करणारं ठरू शकतं.