Facebook (Photo Credits: Facebook)

WhatsApp, Facebook and Instagram Down: आज सकाळी फेसबुक (Facebook), मेसेंजर (Messenger), व्हॉट्सअ‍ॅप वेब (whatsapp web) आणि इन्स्टाग्राम (Instagram) वापरकर्त्यांनी काही वेळेसाठी समस्यांचा सामना करावा लागला. याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी ट्विटरवर जाऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत फेसबुकच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे हे दुसरे आउटेज आहे. वापरकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी फेसबुक अ‍ॅप उघडले तेव्हा त्यांना Sorry, something went wrong' आणि the pages weren't available अशा आशयाचे मेसेज पाहायला मिळत होते. ही समस्या फेसबुकमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे उद्धभवू शकते. Downdetector च्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅप वेब दुपारी 2 ते 4 या वेळेत डाऊन होते.

दरम्यान, 19 मार्च रोजी तांत्रिक बाबींमुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम डाऊन झाले होते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामने आपल्या बहुतेक वापरकर्त्यांना हे सांगण्यासाठी ट्विटरचा वापर केला. या पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, आज कॉन्फिगरेशन बदलामुळे काही लोकांना फेसबुक सेवा उपलब्ध नव्हत्या. त्यानंतर, आम्ही त्वरित तपास केला आणि या समस्येचे निराकरण केले. (वाचा - Whatsapp कडून Vaccines for All Stickers चे अनावरण; कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल)

भारतीय वेळेनुसार, रात्री 11 वाजल्यापासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर यूजर्संना मेसेजेसची देवाणघेवाण आणि लॉग इन करण्यात समस्या उद्भवली. ही समस्या सर्व प्रकारच्या डिव्हाइस अँड्रॉइड, आयओएस आणि पीसीवर होती. लोकांना सुरुवातील ही नेटवर्कची समस्या असल्याचं वाटलं. परंतु, नंतर साइट डाउन झाल्याचं यूजर्संना समजलं. सोशल मीडिया अ‍ॅप व्हॉट्सअॅप जवळजवळ अर्धा तास पूर्णपणे डाउन होते. काही यूजर्संचे फेसबुक सुरू होते, तर काही वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, कंपनीने काही वेळातचं या समस्येचं निराकरण केलं.