Vodafone ने रिव्हाईज केला 98 रुपयांचा  प्रीपेड प्लॅन; आता मिळेल एक्स्ट्रा 6GB डेटा फ्री
Vodafone (Photo Credits: Twitter)

आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे प्लॅन्स, सुविधा सादर करण्याऱ्या टेलिकॉम कंपनी वोडाफोन (Vodafone) ने अलिकडच्या काळात RedX प्लॅनमध्ये 10% वाढ केली. यामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. परंतु, आता वोडाफोनने युजर्संना दिलासा देण्यासाठी एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. कंपनीने आपल्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे युजर्संना 6GB एक्स्ट्रा डेटा मोफत मिळेल. हा कंपनीचा अॅड-ऑन डेटा प्लॅन (Add on Data Plan) आहे. यामुळे युजर्संना अतिरिक्त डेटाचा आनंद घेता येईल. तर जाणून घेऊया या प्लॅन अंतर्गत मिळणाऱ्या सुविधांविषयी:

वोडाफोनने 98 रुपयांचा प्लॅन रिव्हाईज केला असून यात युजर्संना 6GB एक्स्ट्रा डेटा मोफत मिळेल. यामुळे ग्राहकांना डेटाचा आनंद घेता येईल. मात्र यात फ्री कॉलिंगची सुविधा देण्यात आलेली नाही. याची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. सध्या सुरु असलेल्या प्लॅनमध्ये हा प्लॅन अॅक्टीव्ह केल्यास पूर्वीच्या प्लॅनची व्हॅलिडीटी संपल्यानंतरही हा प्लॅन सुरु राहील. वोडाफोन वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, युजर्संना या प्लॅनअंतर्गत एकूण 12 GB डेटा मिळेल. पूर्वी या प्लॅनमध्ये 6GB डेटा दिला जात होता. त्यात एक्स्ट्रा 6GB डेटा दिला जात असल्याने एकूण 12 GB डेटाचा आनंद युजर्संना घेता येणार आहे. (Vodafone चे तीन डबल डेटा प्लॅन्स; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स)

वोडाफोनचा हा अॅड ऑन प्लॅन काही ठराविक ठिकाणीच उपलब्ध करुन दिला जात आहे. यात मुंबई, दिल्ली, आंध्रप्रदेश, केरळ आणि उत्तर प्रदेश या भागांचा समावेश आहे. पण लवकरच हा प्लॅन इतर ठिकाणीही उपलब्ध करुन दिला जाईल, अशी आशा आहे.