Vodafone (Photo Credits: Twitter)

युजर्संना खूश करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या सातत्याने नवे प्लॅन्स सादर करत असतात. वोडाफोनने (Vodafone) देखील नवे प्लॅन सादर करत युजर्संना खूशखबर दिली आहे. वोडाफोनने डबल डेटा (Double Date) ऑफर युजर्ससाठी सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्स 4 GB डेली डेटाचा लाभ घेऊ शकता. या प्लॅन्समध्ये अन्य सुविधा देखील दिल्या जात आहेत. तर जाणून घेऊया डबल डेटा प्लॅन्सच्या किंमती आणि त्यात मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल. (Airtel, Vodafone-Idea च्या ग्राहकांना मोठा दिलासा; प्री पेड प्लॅन्सच्या वैधतेत 3 मे पर्यंत वाढ)

वोडाफोन वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 299, 449 आणि 699 रुपयांचे प्रीपेड प्लॅन्स डबल डेटासह लॉन्च करण्यात आले आहेत. याशिवाय युजर्संना Vodafone Play आणि Zee5 चे सब्सक्रिप्शन फ्री दिले जात आहे.

299 रुपयांचा प्लॅनः

299 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत 2GB डेली डेटा ऐवजी 4GB डेटा दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील मिळत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.

449 रुपयांचा प्लॅनः

या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. यात 2GB + 2GB म्हणजेच एकूण 4GB डेली डेटा दिला जात आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड कॉल आणि 100 एसएमएस दर दिवसाला मिळतील.

699 रुपयांचा प्लॅन:

या प्लनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. यात व्हॅलिडिटी दरम्यान युजर्संना 4GB डेली डेटा मिळेल.

या डबल डेटा प्लॅन्स ऑफर्स काही ठराविक भागांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यात दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकता, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, राजस्थान आणि जम्मू काश्मीर या राज्य/शहरांचा समावेश आहे.