Vivo S1 Pro: किंमतीच्या तुलनेत जबरदस्त कॅमेरा आणि स्टोरेज फिचर देणारा विवोचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच; पाहा याची आकर्षक वैशिष्ट्ये
Vivo S1 Pro (Photo Credits: Vivo Twitter)

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने आपला नवीन स्मार्टफोन Vivo S1 Pro भारतात लाँच केला आहे. नववर्षाच्या सुरुवातीला भारतातील ग्राहकांसाठी विवो कंपनीने हे खास गिफ्ट आणले आहे. या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे आकर्षक म्हणजे यात 48MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. आजपासून तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता. या स्मार्टफोनची किंमत 19,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन विवोच्या अधिकृत साइटवर तसेच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरही तुम्ही खरेदी करु शकता.

या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाची सुपर AMOLED फुल HD प्लस डिस्प्ले दिले गेले आहे. तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आहे.

याच्या स्टोरेजविषयी बोलायचे झाले तर यात 8GB रॅम आणि 128GB नेटिव स्टोरेज देण्यात आले आहे. हि-यांच्या आकार असलेला कॅमेरा हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. किंबहुना अशा प्रकारचा हा पहिला स्मार्टफोन आहे. Vivo S1 Pro जानेवारी 2020 मध्ये लाँच होणार; पाहा काय असतील या स्मार्टफोनची ठळक वैशिष्ट्ये

याच्या कॅमे-ायविष्यी बोलायचे झाले तर यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 8MP चा सेकंडरी स्नॅपरसह 2MP लेन्ससुद्धा दिली आहे. त्यासोबत 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ग्राहकांना हा फोन मिस्टिक ब्लॅक, जॅजी ब्लू आणि ड्रिमी व्हाइट अशा 3 रंगात उपलब्ध होईल.

Vivo S1 Pro आमच्या केंद्रीय एस सीरिजचे दुसरे एडिशन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.