VideoMeet भारतीय अॅपचे खास फिचर लॉन्च; Google meet आणि Zoom ला देणार टक्कर, पहा काय आहे खासियत
VideoMeer (Photo Credits: Twitter)

मेड इन इंडिया व्हिडिओ कॉन्फेंसिंग प्लॅटफॉर्म व्हिडिओमीट (VideoMeet) ब्रेकआउट रूम्स (Breakout Rooms) फीचर लॉन्च करणार आहे. या फिचरमुळे होस्ट व्हिडिओ मिटिंग लहान लहान सेक्शन-कम-रुममध्ये डिव्हाईस करता येईल. तसंच मिटिंग होस्ट मिटिंगमध्ये सहभागी सदस्यांना वेगवेगळ्या सेशनमध्ये ऑटोमॅटिकली किंवा मॅन्यूअली रुपात डिव्हाईड करु शकतील. याशिवाय सहभागींना ब्रेकआऊट सेशन करण्याचे किंवा एंटर करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. होस्ट कधीही सेशन्सच्या दरम्यान स्विच करु शकतात. परंतु, होस्ट सर्व रुम्समधून एकत्र ऑडिओ ऐकू शकणार नाही.

VideoMeet चे ब्रेकआऊट रुम फिचर:

VideoMeet चे ब्रेकआऊट रुम फिचर कोणत्याही लहान किंवा मोठ्या मीटिंग ब्रेनस्टॉर्मिंग सेशनसाठी सर्वात चांगले आहे. हे फिचर यापूर्वी Google meet आणि Zoom वर उपलब्ध होते. ही सुविधा दोन मोडमध्ये उपलब्ध आहे- मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक. पहिल्या मोडमध्ये लोकाना कॅमेऱ्यात असाईन करणे मॅन्युअली होते. तर दुसऱ्या मोडमध्ये हे काम ऑटोमॅटिकली होत असते. विशेष म्हणजे कोणत्याही लिमिटेशन किंवा रिस्ट्रॅक्शन शिवाय या सुविधा उपलब्ध आहेत.

विंडोज पीसी, अॅनरॉईड आणि iOS वरही करु शकता वापर:

व्हिडिओमीटचे संस्थापक डॉ. अजय डेटा यांनी सांगितले की, ब्रेकआऊट रुम कॉर्पोरेट ट्रेनिंग, कोचिंग, ट्युशन आणि शाळांचे ऑनलाईन वर्ग यांच्यासाठी देखील सुयोग्य आहे. हे अ‍ॅप टीम कॉम्पिटिशनसाठी देखील चांगले आहे. याचा वापर विंडोज पीसी, अॅनरॉईड आणि आयओएस या तीन फोन डिव्हाईसमध्ये करता येईल.

नोव्हेंबर 2020 मध्ये व्हिडिओमीटेच प्लेबॅक मोड सुरु झाले. याद्वारे होस्टला रेकॉर्डेड व्हिडिओ मीटिंगमध्ये शेड्युल करु शकतील. अशा प्रकारे सहभागींजवळ रेकॉर्डेड सेशन पाहण्याचा पर्याय असतो. मात्र, यासाठी अ‍ॅडमिनकडून मिटिंग शेअर करणे गरजेचे आहे. दरम्यान, ही सुविधा सुरक्षित आणि मोफत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.