सोशल मीडियाची क्रेझ सगळ्यांना आहे. त्यावर व्यक्त होणे, फोटोज, पोस्ट शेअर करणे हा आता आपल्या जीवनाचा एक भाग झाला आहे. मात्र ट्रोलिंगला (Trolling) अनेकजण कंटाळतात. ट्विटर (Twitter) बहुतांश प्रमाणात आपले मत व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. परंतु, त्या नंतर होणारे ट्रोलिंग अनेक वादांना वाचा फोडतात. त्यामुळे ट्विटर आता नवीन फिचर युजरसाठी सुरु करणार आहे. त्यासाठी एक टेस्ट लॉन्च करण्यात आली असून यात युजरला तीन ऑप्शन दिले जात आहेत. त्यामुळे ट्विट करण्यापूर्वी त्यावर कोण कमेंट करणार आणि त्यानंतर होणाऱ्या चर्चेत कोण सहभागी होणार यासाठी तीन पर्याय दिले जात आहेत. ते तीन पर्याय असे आहेत- everyone, only people you follow आणि only people you mention. त्यामुळे सेटिंग करताना तुम्ही only people you follow किंवा only people you mention हा पर्याय निवडल्यास इतर लोकांना तुमच्या पोस्टवर रिप्लाय बटण दिसणार नाही.
ट्विटरने बुधवारी (20 मे) दिलेल्या माहितीनुसार, जरी युजरला एखाद्या ट्विटवर रिप्लाय करता येणार नसेल तरी तो त्यावर रिट्विट किंवा रिट्विट विथ कमेंट करु शकतो. त्याचबरोबर तेच ट्विट लाईक देखील करु शकतो. लोकांना आपला संवाद, चर्चा नियंत्रित करता यावेत आणि इतर युजर्सचे रिप्लाय हाईड करता यावे, यासाठी आम्ही गेल्या वर्षभरापासून काम करत आहोत. (Instagram चे नवे फिचर; ट्रोलिंग कमेंट्स एकत्र डिलिट करता येणार, पाहा कसा कराल 'या' फिचरचा वापर)
Twitter Tweet:
Testing, testing...
A new way to have a convo with exactly who you want. We’re starting with a small % globally, so keep your 👀 out to see it in action. pic.twitter.com/pV53mvjAVT
— Twitter (@Twitter) May 20, 2020
केवळ ठराविक युजर्स या नव्या फिचरचा लाभ घेऊ शकतात. आयओएस, अॅनरॉईड आणि ट्विटर. कॉम यांच्या काही युजर्ससाठीच ही सेटिंग उपलब्ध आहे. यासोबतच एखाद्या ट्विटमधील सर्व कन्वर्सेशन सहजरित्या वाचता यावेत, रिप्लायसाठी नवीन लेआऊट आणि रिट्विट सहजरित्या हाताळता यावे यावरही ट्विटर काम करत आहे.