Instagram चे नवे फिचर; ट्रोलिंग कमेंट्स एकत्र डिलिट करता येणार, पाहा कसा कराल 'या' फिचरचा वापर
Instagram New Feature (Photo Credits: Instagram Twitter)

इंस्टाग्राम (Instagram) आपल्या युजर्संना नावीण्यपूर्ण आणि अधिक चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. आता देखील अनेक नवनव्या बदलांसह एक महत्त्वपूर्ण नवे फिचर इन्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी सादर केले आहे. हे फिचर खास असून अतिशय उपयुक्त आहे. यामुळे ट्रोलिंग कमेंट्स एकत्रितपणे डिलिट करणे सोपे होणार आहे. युजर्ससाठी सोशल मीडियाचा पॉझिटीव्ह प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याचा यामागील उद्देश आहे. "अनेक नको असलेल्या कमेंट्स एकाच वेळी डिलिट करण्यासाठी आम्ही एक नवे फिचर सादर करत आहोत. हे फिचर नक्कीच युजर्संना भावेल. म्हणूनच आम्ही एकाच वेळी अनेक कमेंट्स डिलिट करण्याचा फिचरची चाचणी करत आहोत. त्याचबरोबर अनेक ट्रोलिंग, नकारात्मक कमेंट्स करणारे अकाऊंट्स ब्लॉक करणे यावरही काम करत आहोत," असे कंपनीने मंगळवारी (12 मे) केलेल्या निवदेनात म्हटले आहे.

आयओएस (iOS) वर या फिचरचा वापर करण्यासाठी कमेंटवर टॅब करा. त्यानंतर उजव्या बाजूला वर येणाऱ्या तीन डॉर्सवर क्लिक करा. सिलेक्ट Manage Comments हा पर्याय निवडा आणि डिलिट करण्यासाठी कमेंट सिलेक्ट करा. अशा पद्धतीने तुम्ही एकाच वेळी 25 कमेंट्स डिलिट करु शकता. 'More Options' चा वापर करुन तुम्ही एकाच वेळी अनेक ट्रोलिंग अकाऊंट्स ब्लॉक करु शकता. अॅनरॉईड (Android) मध्ये या फिचरचा वापर करण्यासाठी कमेंटवर प्रेस करु होल्ट करा. त्यानंतर डॉटेड आयकॉनवर क्लिक करुन Block किंवा Restrict पर्याय निवडा. (Instagram चे नवे फिचर, कंप्युटरच्या माध्यमातून आता युजर्सला Direct Message करता येणार)

तसंच तुम्हाला कोण पोस्टमध्ये टॅग करणार यावर देखील तुमचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे तुमच्या परवानगी शिवाय तुम्हाला कोणीही पोस्ट, कमेंट, कॅप्शन किंवा स्टोरीमध्ये टॅग करु शकणार नाही. यासाठी तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले आहेत. Everyone, only people you follow किंवा no one. त्याचबरोबर इंस्टाग्राम पिन कमेंट्स हा ऑप्शनची टेस्टिंग करत आहेत. त्यामुळे तुम्हाला हवी ती कमेंट तुम्ही पोस्टवर टॉप पिन करु शकाल. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली कमेंट तुमच्या पोस्टवर सर्वप्रथम दिसेल.