Elon Musk यांनी आता ट्वीटर बाबत अजून एक मोठी घोषणा केली आहे. आता युजर्सना त्यांच्या कॅटेगरीनुसार विशिष्ट मर्यादेतच ट्वीट्स पाहता येणार आहेत. एलन मस्क यांचे हे ट्वीट लिमिट्स चे गणित सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मस्क यांच्या ट्वीट नुसार ते या लिमिट मध्ये वाढ करण्याच्या विचारात आहे. शनिवार 1 जुलै दिवशी घोषणा करताना मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हेरिफाईड युजर्सना 6000 पोस्ट प्रतिदिन पाहता येतील त्याखालोखाल अनव्हेरिफाईड युजर्स 600 तर नवे अनव्हेरिफाईड युजर्स 300 पोस्ट पाहू शकतील.
सोशल मीडीयात यावरून झालेल्या चर्चेनंतर मस्क यांनी लिमिट वाढवत असल्याचं सांगत ही मर्यादा 8000 व्हेरिफाईड साठी 800 अनव्हेरिफाईड साठी आणि 400 नव्या व्हेरिफाईड केल्याचं सांगितलं. काही तासांतच अनुक्रमे ही मर्यादा 10 हजार, 1 हजार आणि 500 करण्यात आली. अनेक युजर्सची ही मर्यादा ओलांडली गेल्यामुळे त्यांच्यासाठी ट्वीटर डाऊनचे मेसेज दिसत असल्याचं जगभरातील काही युजर्सने म्हटलं आहे. Twitter वापरकर्त्यांना जागतिक स्तरावर बसला Rate Limit Exceeded चा फटका; वापरकर्त्यांनी ट्विटद्वारे केल्या तक्रारी .
#TwitterDown pic.twitter.com/lrDM4UDVxb
— Aniket Bhardwaj (@__its_ab__) July 2, 2023
@elonmusk mama playing kabadi with twitter & users 🤦🏻♂️#TwitterLimits #TwitterFail #Twitterdown pic.twitter.com/NZBmN340zI
— Mr.RK (@RavikumarJSP) July 2, 2023
"मी 'view limits' सेट करण्याचे कारण म्हणजे आपण सर्व ट्विटरच्या अधीन झालो आहोत आणि त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. मी जगासाठी चांगले काम करत आहे," असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे. मस्कच्या मते, हा बदल "डेटा स्क्रॅपिंग आणि सिस्टम मॅनिप्युलेशन" साठी तात्पुरता मार्ग आहे. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला जागतिक स्तरावर एक मोठा आउटेज झाल्यामुळे भारतासह जगभरातील लाखो युजर्सनी त्यावर टीका केल्यामुळे त्याचे स्पष्टीकरण समोर आले आहे.
याआधी शनिवारी, ट्विटरने खाती नसलेल्या लोकांसाठी त्याच्या वेब प्लॅटफॉर्मवर ब्राउझिंग प्रवेश बंद केला आहे. "आमच्याकडे इतका डेटा लुटला जात होता की सामान्य युजर्ससाठी ही सेवा मानहानीकारक होती," असे मस्क यांनी पोस्ट केले आहे. "एआय करणारी जवळजवळ प्रत्येक कंपनी, स्टार्टअप्सपासून ते पृथ्वीवरील काही मोठ्या कॉर्पोरेशनपर्यंत, मोठ्या प्रमाणात डेटा स्क्रॅप करत होती," असा दावा त्यांनी केला आहे.