ट्विटर इंडियाने (Twitter India) भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन फ्लीट्स (Fleets) फीचर लॉन्च केले आहे. या नवीन वैशिष्ट्याद्वारे, वापरकर्ते त्यांच्या फॉलोअर्सशी एका खास मार्गाने संवाद साधू शकतील. हे वैशिष्ट्य ब्राझील आणि इटलीमधील वापरकर्त्यांसाठी यापूर्वीच लाँच केले गेले आहे. ट्विटरवर अशाप्रकारच्या संवादाची ही नवीन शैली वापरणारा भारत तिसरा देश ठरला आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्रमाणेच, फ्लीट्सद्वारे पोस्ट केलेले फोटो किंवा इतर संदेश केवळ 24 तासच उपलब्ध असतील. 24 तासांनंतर, ते प्रोफाईलमधून गायब होतील. सध्या इन्स्टाग्राम व फेसबुकवर स्टोरीच्या रूपाने अशा प्रकारे कंटेंट पोस्ट करता येतो. मात्र या फ्लीट्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्याद्वारे शेअर केलेली माहिती कोणीही रीट्वीट, लाईक किंवा त्यावर कमेंट करू शकणार नाही.
ट्विटर फ्लीट्स फिचर सध्या टेस्टिंगसाठी आणले गेले आहे. सध्या तरी हे केवळ अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लीट्स फिचरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जर कोणी तुम्हाला फॉलो करत असेल तर, आपले फ्लीट हे नेहमी आपल्या फॉलोअर्सच्या टाइमलाइनच्या टॉपवर राहील. ज्यामुळे तुम्ही पोस्ट करत असलेली माहिती आपल्या फॉलोअर्सन नेहमी पहिल्यांदा दिसेल. फ्लीटद्वारे केलेल्या पोस्टच्या तळाशी क्लिक करून आपण, आपल्या फ्लीटला आपल्या फॉलोअर्सपैकी कोणी पाहिले आहे का, हे पाहू शकाल. (हेही वाचा: स्मार्टफोनमध्ये Storage ची समस्या उद्भवतेय? 'या' पद्धतीने वाढवा स्पेस)
Testing, testing…
We’re testing a way for you to think out loud without the Likes, Retweets, or replies, called Fleets! Best part? They disappear after 24 hours. pic.twitter.com/r14VWUoF6p
— Twitter India (@TwitterIndia) June 9, 2020
जाणून घ्या कसे वापरावे -
- ट्विटर यूजर फ्लीट्स फिचर वापरण्यासाठी, प्रथम आपल्या युजर प्रोफाइलच्या डाव्या बाजूला अवतार वर (प्रोफाइल पिक्चर) टॅप करा.
- यानंतर, वापरकर्ते त्यांच्या फ्लीटमध्ये कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा GIF इमेज जोडू शकतात.
- आपण दुसर्या वापरकर्त्याचे फ्लीट्स पाहू इच्छित असल्यास त्या वापरकर्त्याच्या अवतारवर टॅप करा.
- यानंतर आपल्याला त्या वापरकर्त्याद्वारे पोस्ट केलेले नवीनतम फ्लीट दिसेल.
- आपण त्या वापरकर्त्याची जुनी फ्लीट्स पाहू इच्छित असल्यास आपण डावीकडे किंवा उजवीकडे स्वाइप करू शकता.
Ciao! Today, Fleets are expanding to Italy! 🇮🇹 Fateci sapere cosa ne pensate twittando con l’hashtag #FleetsFeedback! 🇮🇹🙏 pic.twitter.com/y24qQa3mgj
— Kayvon Beykpour (@kayvz) May 21, 2020
या फिचरमध्ये फ्लीट्स पाहिल्यानंतर त्या युजर्सला थेट मेसेज करता येणे शक्य आहे. दरम्यान, याबाबत बोलताना ट्विटर ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजर मो अल अधाम यांनी सांगितले की, 'कमी प्रेशर आणि अधिक नियंत्रणासह लोकांना वेगवेगळ्या प्रकारे ट्विटरवर संभाषण करता यावे अशी आमची इच्छा आहे. म्हणूनच आम्ही त्यांचे फ्लीटद्वारे शेअर केलेले विचार तपासत आहोत.'