TikTok App आता नाही होणार डाऊनलोड; Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट
TikTok | (Photo Credits: Wiki Commons)

अनेकांचे स्मार्टफोन, सोशल मीडिया, युट्युब आदीवंर धुमाकूळ घालणारे TikTok Videos आता यापुढे युजर्सना तयार करता येणार नाहीत. कारण, Porn Videos ला आळा घालण्यासाठी गूगल-प्ले, अॅपलकडून अॅप डिलीट करण्यात आले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) या अॅपवर कारवाई कण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानंतर केंद्र सरकारने TikTok हे अॅप काढून टाकण्याबाबत गूगल (Google) आणि अॅपल (Apple) कंपनीला आदेश दिले होते. केंद्र सरकारचे आदेश प्रमाण मानत या दोन्ही कंपन्यांनी TikTok App हटवले आहे.

उच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Google) आणि अॅपल (Apple) कंपनीला सांगितले की, TikTok अॅपवर कारवाई करा. माहिती प्रसारण मंत्रालयाचा आदेश मिळताच गुगल प्ले स्टोर वरुन हे अॅप हटविण्या आले. TikTok अॅपबाबत सांगितले जाते की, या अॅपवर कोणत्या प्रकारचा आशय निर्माण केला जाऊ शकतो याबाबत कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही.

काय आहे TikTok ?

टिक टॉक अॅप (TikTok App) ही चीनी बनावटीची जादू आहे. वास्तवात टिक टॉक (TikTok) हे एक सोशल मीडिया अॅप्लिकेशव आहे. या अॅपच्या माध्यमातून युजर्स छोटे छोटे व्हिडिओ (15 सेकंदांपर्यंत) बनवू शकतात. महत्त्वाचे म्हणजे हे व्हिडिओ शेअरही करता येतात. 'बाईट डान्स' नावाच्या कंपनीकडे TikTok चा स्वामित्व हक्क (कॉपिराईट अधिकार) आहेत. बाईट डान्स कंपनीने 2016 मध्ये हे अॅप तयार आणि लॉन्च केले. अल्पावधीतच हे अॅप जगभरात प्रसिद्ध झाले. ऑक्टोबर 2018 मध्ये सर्वाधिक डॉऊनलोड करण्यात आलेले TikTok हे सर्वोच्च अॅप ठरले. अमेरिकेत TikTok वर तब्बल 40 कोटी रुपयांचा दंडही लागला आहे. (हेही वाचा, गुगल आणि अ‍ॅपल कंपनीला TikTok अ‍ॅप ताबडतोब काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे आदेश)

गूगल प्ले स्टोर TikTok ची ओळख काय सांगते पाहा

गूगल प्ले स्टोर TikTok अॅपची ओळख 'Short videos for you' (आपल्यासाठी छोटे व्हिडिओ) अशी करुन दिली आहे. प्ले स्टोरवर टीक टॉक परियचयाबाबत लिहिले आहे की, मोबाईलच्या माध्यमातून छोटे व्हिडिओ बनविण्याचे TikTok हे महत्त्वाचे आणि सोपे माध्यम आहे. यात कोणतीही फसवेगिरी नाही. तसेच, हे वास्तव असून त्याला कोणतीही मर्यादा नाही. TikTok वर या आणि केवळ 15 मिनिटांमध्ये तुम्ही जगाला तुमची स्वत:ची कहाणी सांगा.

भारतामध्ये TikTok जोरदार प्रसिद्ध

भारतामध्ये TikTok डाऊनलोड करण्याचे प्रमाण तब्बल 100 मिलियनहून अधिक असल्याची माहिती इंटरनेटवर मिळते. 'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिमहिना सुमारे 20 मिलियन भारतीय TikTok वापरतात. भारतीयांमध्ये TikTokच्या लोकप्रियतेचा अंदाज या संख्येवरुनच येऊ शकतो. गूगल प्ले स्टोरवर तब्बल आठ मिलियन लोकांनी TikTok रिव्ह्यू केला आहे. विशेष म्हणजे टिक टॉक व्हिडिओ बनविण्याचे सर्वाधिक प्रमाण हे खेडेगाव आणि छोट्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. सहा-सात वर्षांच्या मुलांपासून ते वृद्ध नागरिक आणि मुली महिलांसोबतच अवघ्या तरुणाईलाही TikTok ने वेढ लावले होते.