Tecno Spark 7 Pro भारतात 25 मे ला होणार लाँच, जाणून घ्या काय असतील खास वैशिष्ट्ये
Tecno Spark 7 Pro (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Tecno Spark 7 Pro असे या स्मार्टफोनचे नाव असून येत्या 25 मे ला हा फोन भारतात लाँच होणार आहे. कंपनीने ट्विटद्वारे या स्मार्टफोनच्या लाँचिंग डेटची अधिकृत माहिती दिली आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात मोठी बॅटरी (Battery Life) आणि मिडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tecno Spark 7 Pro स्मार्टफोन 4GB रॅम आणि 6GB रॅम अशा दोन वेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 4GB रॅम आणि 64GB वेरियंटची किंमत 10,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 14,000 ते 15,000 दरम्यान असू शकते.हेदेखील वाचा- मोबाईल फोनचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात? 'या' सोप्प्या स्टेप्स वापरुन करा अनलॉक

Tecno Spark 7 Pro च्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर यात 6.6 इंचाची FHD+ डिस्प्ले असू शकते. हा स्मार्टफोन Android 11 वर चालेल. त्याशिवाय यात मिडियाटेक हेलिओ जी80 SoC असू शकतो.

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 48MP चा प्रायमरी असू शकतो. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एक डेप्थ सेंसर आणि एक AI लेन्सचा समावेश असेल. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये 8MP चा कॅमेरा मिळेल. याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, यात 5000mAh ची बॅटरी मिळत आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे.