अमेरिकन ब्रँड Anker च्या सब ब्रँड Soundecore ने आपला एक जबरदस्त ईअरबड्स भारतात लाँच केला आहे. Life Dot 2 ट्रू वायरलेस असे या ईअरबड्सचे (Earbuds) नाव असून हा 3499 रुपयात भारतात लाँच करण्यात आला आहे. या वायरलेस ईअरबड्सचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यात 100 तासांचा म्यूजिक प्ले बॅक देण्यात आला आहे. हा स्टायलिश काळ्या फिनिश डिझाईनसह येतो. हा ईअरबड्स तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साइट Flipkart वर खरेदी करू शकता. यासह तुम्हाला 18 महिन्यांची वॉरंटी सुद्धा मिळत आहे.
Life Dot 2 ट्रू वायरलेस याच्या खास वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, फिटनेस फ्रिक यूजर्ससाठी समोर ठेवून हा खास बनविण्यात आला आहे. Soundcore Life Dot 2 मध्ये कॉम्पॅक्ट आणि एर्गोनॉमिक डिझाईन पाहायला मिळेल. इन ईअर फिटिंगसह येणा-या या ईअरबड्समध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसुद्धा मिळतो. याला देण्यात आलेल्या हॉलो सिलिकॉन बिल्ड डिजाईनमुळे तुमच्या कानाला उत्कृष्ट अनुभव मिळतो. त्यामुळे यावर गाणी ऐकताना किंवा बोलताना कानाला कुठलाही त्रास होत नाही. हा स्टायलिश ट्रू वायरलेस ईयरबड्स यूनिक AirWings फिटिंग्ससह येतो.
हेदेखील वाचा- भारतात लाँच झाले वायरलेस ईअरबड्स ITW-60; याची किंमत आणि वैशिष्ट्ये पाहून तुम्हालाही बसेल सुखद धक्का
यावर मिळणा-या म्यूजिक अनुभवाविषयी बोलायचे झाले तर, यात 8mm चे ट्रिपल लेयर डायनॅमिक ड्रायवर वापरले आहे. यावर 40% पर्यंतचा बेस आणि 100%पेक्षा जास्त ट्रबल प्रोड्यूस करतो. यात मल्टीपल पेअरिंग मोड्स दिले आहेत. हा वॉटर आणि डस्ट रेसिस्ट्ंस आहे.
याच्या चार्जिंगविषयी बोलायचे झाले तर, याच्या चार्जिंग केसमध्ये 4x बॅटरी कपॅसिटी दिली गेली आहे. जी अन्य ईअरबड्सपेक्षा चारपट जास्त आहे. हा एकदा चार्जिंग केल्यास 8 तासांचा प्लेबॅक टाईम देतो.