प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

सध्या सिम कार्ड (SIM Card) स्वाइप करुन बँक खात्यातून पैसे चोरी केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आतापर्यंत काही लोकांच्या बँक खात्यामधून लाखो रुपये चोरी झाल्याचा घटना उघडकीस आल्या आहेत. नुकत्याच दिल्ली येथील एका उद्योजकाच्या बँक खात्यामधून 18 लाख रुपये चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. फसवणुक करणाऱ्या व्यक्ती बँक खात्यासाठी देण्यात आलेला मोबाईल क्रमांक मोठ्या चालाखीने बदलतात. तसेच आरोपी पकडला गेल्यास चोरी केलेली रक्कम विविध बँकांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करतात.

तर जाणून घेऊया काय आहे नेमके सिम स्वाइप प्रकरण. सिम स्वाइप म्हणजे सिम एक्सेंचेंज किंवा सिम कार्ड क्लोनिंग. यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांकावरुन एका नव्या सिम कार्डसाठी रजिस्ट्रेशन केले जाते. त्यावेळी तुमचे सुरु असलेले सिम कार्ड बंद होते आणि फोनवरील नेटवर्क दाखवले जात नाही. असे झाल्यानंतर फसवणुक करणारा व्यक्ती दुसऱ्या सिम कार्डवर येणारा ओटीपी क्रमांकाचा वापर करुन तुमच्या बँक खात्यातील रक्कम चोरी करतो.

या प्रकरणाची सुरुवात तुम्हाला एक फोन येतो. त्यामध्ये फोनवरुन बोलणारा व्यक्ती हा सिम कार्ड कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवतो. फोनवरील संभाषणात तो व्यक्तीला तुमच्या फोनवरील कॉल ड्रॉप किंवा इंटरनेट स्पिड वाढण्यासाठी काय करावे याबद्दल सांगतो. दरम्यान तुमच्या सिम कार्डचा 20 डिजिट असलेला एक युनिक क्रमांक देण्यासाठी सांगतो. हा क्रमांक सिम कार्डच्या पाठीमागे लिहिलेला असतो. तुम्ही हा क्रमांक फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीला सांगितल्यास तो तुम्हाला 1 क्रमांक दाबण्यास सांगतो. यामुळे ऑथेन्टिकेशन होऊन सिम स्वॅप ही प्रक्रिया पूर्ण होते.(बंगळुरु: एका चुकीच्या Google Search मुळे महिलेने गमावली बँक खात्यामधील सर्व रक्कम)

त्यामुळे या प्रकारापासून वाचण्यासाठी कोणतेही फेक अॅप किंवा अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या फोनवर तुमच्या बँक खात्याबद्दल कोणतीही वाच्यता करु नये. तसेच आधार कार्ड क्रमांक सुद्धा कोणासोबत शेअर करु नये. यामुळे सुद्धा तुमच्या बँक खात्यामधील पैसे चोरीला जाण्याची शक्यता असते. मात्र सिम स्वाइप मध्ये तुमच्या मोबाईलचे नेटवर्क दिसेनासे झाल्यास मोबाईल स्विचऑफ करु नये. कारण सिम पुन्हा एक्टिव्हिट होण्यासाठी 4 तासांचा कालावधी लागतो. मात्र या 4 तासाच्या अंतरामध्ये तुमचे पैसे चोरीला गेले आहेत हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही.