Shocking! देशातील तरुणाई Internet च्या आहारी; दिवसातील 8 तास Online खर्च करते
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

गेल्या पाच वर्षांत भारतामधील मोबाइल ब्रॉडबँड ग्राहक (Mobile Broadband Subscribers) संख्या 345 दशलक्ष वरून 765 दशलक्ष पर्यंत दुप्पट झाली आहे. सोबतच सरासरी मोबाइल डेटा वापर आता प्रति वापरकर्ता 17GB पर्यंत पोहोचला आहे, एका नवीन अहवालातून ही बाब समोर आली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या नोकियाच्या वार्षिक 'मोबाइल ब्रॉडबँड इंडेक्स (एमबीआयटी) रिपोर्ट 2022' (Mobile Broadband Index (MBiT) Report 2022) नुसार, भारताने 2021 मध्ये मोबाइल ब्रॉडबँड डेटामध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली आहे.

4 जी मोबाइल डेटामध्ये 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. तसेच प्रति वापरकर्ता सरासरी मासिक डेटा ट्रॅफिक 26.6 टक्क्यांनी वाढला. अहवालात पुढे म्हटले आहे की, 2021 मध्ये 4G सेवांमध्ये 40 दशलक्षाहून अधिक ग्राहक जोडले किंवा अपग्रेड केले गेले. भारतातील मोबाईल ब्रॉडबँड इकोसिस्टम विकसित करण्यात 4G ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता, आगामी 5G स्पेक्ट्रम लिलाव आणि या वर्षाच्या अखेरीस 5 जी सर्व्हिसचे व्यावसायिक लॉन्च भारतामधील डिजिटल डिव्हाईड कमी करण्यास मदत करेल, असे मत संजय मलिक, SVP आणि इंडिया मार्केटचे प्रमुख यांनी व्यक्त केले.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनरल झेड (18 ते 25 वयोगटातील तरुणाई) दररोज सरासरी 8 तास ऑनलाइन वेळ व्यतीत करतात. भारतातील 90 टक्के इंटरनेट वापरकर्ते त्यांच्या स्थानिक भाषेतील कंटेंट वापरण्यास प्राधान्य देतात. अशाप्रकारे गेल्या पाच वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक डेटा वापरणारा देश बनला आहे. (हेही वाचा: इंस्टाग्रामने बंद केले बूमरँग आणि हायपरलॅप्स अॅप्स, काय आहे कारण जाणून घ्या)

2025 पर्यंत स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 60-75 टक्क्यांपर्यंत वाढेल असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 5G तंत्रज्ञानाचा अनेक क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण वापर वाढल्याने, त्याचा जागतिक GDP च्या 1 टक्क्यांपर्यंत किंवा 2030 पर्यंत $1.3 ट्रिलियन कमाईचा वाटा अपेक्षित आहे.