Super Flower Full Moon 2020 Date and Time: या महिन्यात दिसणार वर्षातील शेवटचा ‘पूर्ण चंद्र’; जाणून घ्या तारीख आणि वेळ
Flower moon (Photo Credits: Pexels)

गेल्या दोन महिन्यांत लागोपाठ 2020 मधील सुपरमून (Supermoon) पाहायला मिळाले होते. मात्र आपण ती संधी गमावली असेल, तर आता पुन्हा एकदा ही संधी आपणास उपलब्ध होत आहे. मे महिन्यात फुल मूनला फ्लॉवर मून (Super Flower Full Moon) असे संबोधले जाते, जो या महिन्याचा 7 तारखेला दिसणार आहे. मात्र लक्षात घ्या हा या वर्षातील शेवटचा फुल मून असणार आहे. म्हणूनच यावर्षी चंद्राला अधिक जवळून पाहण्याची ही शेवटची संधी असणार आहे. याआधी 7 एप्रिल रात्री या वर्षातील 'सुपर पिंक मून 2020' (Pink Super Moon 2020) दिसला होता.

सुपर फ्लॉवर मून 2020 ची तारीख आणि वेळ -

सुपर फ्लॉवर मून 2020,  7 मे रोजी म्हणजेच गुरुवारी असेल. 10.45 युनिव्हर्सल वेळी, म्हणजेच IST मध्ये संध्याकाळी 4.15 वाजता फुल मून दिसेल. भारतात यावेळी उजेड असल्याने आपण कदाचित हा चंद त्यावेळी पूर्णतः पाहू शकणार नाही, परंतु रात्रीच्या वेळी सुपरमून अधिक स्पष्टपणे पाहता येईल.

सुपरमून म्हणजे काय?

जेव्हा पूर्ण चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळील ठिकाणी येतो, तेव्हा त्याला सुपर पूर्ण चंद्र म्हणतात. ही घटना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील लंबवर्तुळाकार कक्षामुळे होते. पेरिगी (Perigee) हा बिंदू आहे जिथे चंद्राची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ असते. सुपरमून दरम्यान, चंद्र  हा अतिशय उजळ दिसतो आणि सामान्य चंद्रापेक्षा तो जवळपास 7% मोठा असतो. (हेही वाचा: Pink Super Moon: आज दिसणार वर्षातील सर्वात मोठा चंद, रंगही बदलणार; जाणून घ्या वेळ व नक्की काय ही घटना)

दरम्यान, प्रत्येक फ्लॉवर फुल मूनला एकापेक्षा अधिक नावे आहेत ज्यामध्ये मदर्स मून, मिल्क मून किंवा कॉर्न प्लांटिंग मून या नावांचा समावेश आहे. 7 मे नंतर पुढच्या वेळी, 27 एप्रिल 2021 रोजी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. यावेळी तो 'सुपर पिंक मून' असेल. ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते चंद्र जेव्हा पृथ्वीजवळ येतो तेव्हा त्याचा पर्यावरण, निसर्ग आणि मनुष्यावर मोठा परिणाम होतो. ज्यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्ती कमी होऊ शकते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या राशि चक्रांवरही त्याचा भिन्न प्रभाव पडतो.