
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जगभरातून अनेक वाईट अथवा नकारात्मक बातम्या येत आहेत. आता तर संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. अशात आज जग एका मोठ्या आणि महत्वाच्या अंतराळविश्वातील घटनेचा साक्षीदार ठरणार आहे. आज, 7 एप्रिल रात्री या वर्षातील सर्वात मोठा चंद (Moon) दिसणार आहे. इतकेच नाही तर आज चंद्राचा रंगही बदलणार आहे. आज रात्री मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार आहे. या गोष्टीला 'सुपर पिंक मून 2020' (Pink Super Moon 2020) म्हटले जाईल. म्हणजेच आज रात्रीचा चंद्र हा गुलाबी रंगाचा असणार आहे.
आज चंद्र पृथ्वीच्या 27493 किलोमीटर जवळ येणार आहे. चंद्राच्या या स्थितीस पेरिगी स्थिती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर अंतरावर आहे. पण, पेरिगी स्थितीमध्ये पृथ्वी व चांदरातील अंतर कमी होऊन ते 3 लाख 56 हजार 907 किलोमीटर होईल. यावेळी, चंद्राचा आकार सामान्यपेक्षा 7 पट जास्त असेल व त्याची चमक देखील 30 टक्के अधिक असेल.
उत्तर अमेरिकेत राहणारे लोक हा चंद्र आज रात्री पाहू शकतील. आशियासह इतरांसाठीही हा चंद्र 8 एप्रिल रोजी युनिव्हर्सल टाईम पहाटे 2.35 वाजता दिसेल. मात्र त्यावेळी भारतामध्ये प्रकाश असल्याने हा चंद्र आपल्या इथे दिसून शकणार नाही.
ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते चंद्र जेव्हा पृथ्वीजवळ येतो तेव्हा त्याचा पर्यावरण, निसर्ग आणि मनुष्यावर मोठा परिणाम होतो. ज्यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक आपत्ती कमी होऊ शकते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या राशि चक्रांवरही त्याचा भिन्न प्रभाव पडतो. (हेही वाचा: सूर्याचा पृष्ठभाग कसा दिसतो पाहिलात काय? पहिल्यांदाच स्पष्ट फोटो; जणू मधमाशीचे पोळेच)
पिंक सुपरमून हे फक्त एक नाव आहे, त्यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. वास्तविक, अमेरिका आणि कॅनडामध्ये या हंगामात फ्लॉक्स सुबुलाटा (Phlox Subulata) नावाच्या फुलाचा बहर येतो, या फुलामुळे आज दिसणाऱ्या चंद्राला पिंक सुपरमून म्हटले जाते. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार, साधारण 41 वर्षांपूर्वी 1979 मध्ये पहिला सुपरमून दिसला होता. यंदा मे महिन्यातही सुपरमून दिसणार आहे मात्र त्याचा आकार आज दिसणाऱ्या चंद्रापेक्षा लहान असेल.