Indian astronaut Shubhanshu Shukla among its crew of four, । X@airnewsalerts

स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान आज शुभांशु शुक्ला सह अन्य 3 अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतणार आहे. त्यांच्या स्प्लॅशडाउनचं काऊंट डाऊन सध्या सुरू झाले आहे. अमेरिकेत कॅलिफॉर्निया मध्ये त्यांचे स्प्लॅशडाउन होणार आहे. Axiome Mission-4 साठी हे चार अंतराळवीर अवकाशामध्ये गेले होते. 18 दिवसांचे वास्तव्य आणि 22.5 तासांच्या परतीच्या प्रवासानंतर त्यांचे स्प्लॅशडाउन होणार आहे. दरम्यान हे स्पॅशडाऊन काय असते आणि त्याला सुरक्षित का मानलं जात? हे जाणून घ्या.

टचडाऊन आणि स्प्लॅशडाउन मध्ये काय असतो फरक?

टचडाऊन मध्ये अंतराळ यान ब्रेकिंग सिस्टिम किंवा पॅराशूटच्या मदतीने थेट जमिनीवर उतरतो. परंतू स्प्लॅशडाउन मध्ये यान हे पाण्यात उतरले जाते. समुद्रामध्ये यान उतरवण्याची प्रक्रिया थोडी सोप्पी आणि कमी वेगवान करण्यासाठी पॅराशूटचा वापर केला जातो. यान पाण्यात उतरवण्याची प्रक्रिया सोप्पी आणि सुरक्षित मानली जाते. नासा च्या अंतराळवीरांच्या माहितीनुसार, पाणी हे एक प्राकृतिक स्वरूपात कुशन म्हणून काम करतं. जमिनीपेक्षा पाण्यात उतरताना त्रास कमी असतो.

स्प्लॅशडाउन  टेक्निक मध्ये कठीण आणि गुंतागुंतीची लॅडिंग गियर नसते. यात अंतराळ यान हलकं होतं. नासा ने मर्करी, जेमिनी आणि अपोलो च्या मिशन नंतर स्प्लॅशडाउन यशस्वीरित्या वापरण्यास सुरू केले आहे. काही महिन्यांपूर्वी नासा चे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बूच विल्मोर देखील स्प्लॅशडाउनच्या माध्यमातूनच पृथ्वीवर परतले होते.

Axiome Mission-4 चे लाईव्ह अपडेट

Axiome Mission-4 चे अंतराळवीर 7 दिवस राहणार रिहॅब मध्ये

आज 15 जुलै दिवशी दुपारी 3 च्या सुमारास (भारतीय वेळे नुसार) यान कॅलिफोर्नियाच्या तटावर उतरणार आहे. शुभांशू शुक्ला सह सारे अंतराळवीर सुमारे 7 दिवस फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली रिहॅब मध्ये राहणार आहे. त्यांना पृथ्वीवरील गुरूत्वार्कषणाशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा मदत केली जाणार आहे. यानासोबत सुमारे 580 पाऊंड कार्गो देखील असणार आहे. यामध्ये नासाची काही उपकरणं आणि मिशनच्या दरम्यान केलेल्या 60 पेक्षा अधिकच्या प्रयोगांमधील वैज्ञानिक डाटाचा समावेश असणार आहे.

Axiome Mission-4 एक महत्त्वाचा टप्पा आहे, विशेषतः भारताच्या गगनयान कार्यक्रमासाठी यामधील अभ्यास महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यासाठी इस्रोला सुमारे 550 कोटी रूपयांचा खर्च आला आहे. 2027 मध्ये भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ उड्डाण गगनयान मोहिमेपूर्वी या मोहिमेने अमूल्य अनुभव प्रदान केला आहे.