Jupiter and Saturn ‘Great’ Conjunction 2020 NASA Live Streaming: ख्रिसमस स्टारच्या रूपाने एकत्र येणार ज्युपिटर आणि शनी; जाणून घ्या कुठे पाहाल ही अवकाशीय घटना
Representational Image (Photo Credits: unsplash.com)

सन 2020 मध्ये संपूर्ण जगाने अनेक विलक्षण खगोलशास्त्रीय घटना (Astronomical Event) पाहिल्या आहेत. उल्का वर्षाव, ग्रह संयोजन, ग्रहण, पौर्णिमेसारख्या काही खगोलशास्त्रीय घटनांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. या आश्चर्यकारक अवकाशीय घटनांनंतर आता सरत्या वर्षामध्ये आपण अजून एका खगोलशास्त्रीय घटनेचे साक्षीदार होणार आहोत. आपल्या सौर मंडळामधील दोन सर्वात मोठे ग्रह ज्युपिटर (Jupiter) आणि शनी (Saturn) जवळजवळ 800 वर्षांनंतर सन 2020 मध्ये रात्री एकमेकांच्या जवळ येणार आहेत. 21 डिसेंबर रोजी सर्वात मोठ्या रात्री या खगोलीय घटनेचा अद्भुत नजारा दिसू शकेल.

असे म्हटले जाते की पूर्वी गुरु आणि शनि 1226 मध्ये एकमेकांच्या इतके जवळ आले होते. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅमिनिस्ट्रेशन, नासाच्या मते, या दोन ग्रहांचे संयोजन (Jupiter & Saturn ‘Great’ Conjunction) एका नाण्याइतके जाडीचे असेल. ही घटना ख्रिसमस तोंडावर असताना घडत असल्याने या आश्चर्यकारक दिव्य घटनेला ख्रिसमस स्टार (Christmas Star) किंवा बेथलेहेमचा स्टार देखील म्हटले जाते. 21 डिसेंबर ही वर्षाची सर्वात मोठी रात्र आहे यासह, यावेळी विंटर सॉलिस्टीस (Winter Solstice) सुरू होते. या वेळी या ग्रहांमधील अंतर केवळ 0.1 डिग्री असेल. सुमारे 800 वर्षांनंतर हे घडत आहे व मानव ही घटना पाहू शकतील.

21 डिसेंबर 2020 रोजी बृहस्पति आणि शनि यांचे कंजेक्शन पाहण्यास लोक उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत हा प्रश्न निर्माण होतो की ही दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना कशी आणि कोठे पाहायची? तर बृहस्पति आणि शनीचे हे  संयोजन नासा थेट प्रक्षेपित करीत आहे. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही ही घटना पाहू शकता. (हेही वाचा: या महिन्यात तब्बल 800 वर्षांनतर आकाशात दिसणार मोठी खगोलशास्त्रीय घटना; दर्शन होणार 'ख्रिसमस स्टार'चे, जाणून घ्या सविस्तर)

नासाच्या म्हणण्यानुसार 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान हे दोन ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ असतील. या वर्षाची ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे, कारण 400 वर्षांनंतर ते एकमेकांच्या जवळ येणार आहेत आणि सुमारे 800 वर्षांनंतर, शनि आणि बृहस्पति एकत्र येत आहेत. ही घटना दुर्बिणीमधूनही पहिली जाऊ शकते. तर बृहस्पति आणि शनि यांचे संयोजन पाहण्याची ही संधी तुम्ही गमावू नका कारण ही संधी गमावली तर आपल्याला 15 मार्च 2080 पर्यंत वाट पहावी लागेल. हवामानामुळे ही घटना पाहण्यास आपण असमर्थ ठरला तर, विविध प्लॅटफॉर्मद्वारे होस्ट केल्या जाणाऱ्या थेट प्रक्षेपणाचा पर्याय तुम्ही निवडू शकता.