Photo Credit- X

India Space Station: भारताचे अंतराळ संशोधन अधिक मजबूत करण्यासाठी ‘भारतीय अंतराळ स्थानक’ (Bharat Antariksha Station) बांधण्यात येणार आहे. हे अंतराळ स्थानक 2035 पर्यंत बांधून पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. विज्ञान मंत्रालयांच्या कामगिरीवर बोलताना सिंग यांनी सरकारच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ उपक्रमांवर प्रकाश टाकला. (PROBA-3 Mission Satellites: इस्रो आज श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करणार प्रोबा-3 मिशन उपग्रह)

'अमेरिका आणि एक-दोन देशांनंतर भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असणार आहे. 2035 पर्यंत ते तयार होईल', असे ते म्हणाले. सध्या उपग्रह प्रक्षेपणात झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवरही सरकारचा भर असल्याचे त्यांना सांगितले. ते म्हणाले, भारताने श्रीहरिकोटा येथून 432 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यापैकी 397 म्हणजे जवळपास 90 टक्के गेल्या दशकात प्रक्षेपित केले गेले आहेत.

अंतराळ स्थानकाची निर्मिती का?

2030 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सेवामुक्त होणार आहे. भारताचे अंतराळ स्थानक पाश्चिमात्य देशांमधील मित्रराष्ट्रांना जागतिक संशोधन सहकार्यासाठी अवलंबून राहण्यासाठी एक महत्त्वाचे संसाधन प्रदान करेल, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘बीएएस’ पूर्णपणे स्वदेशी अभियांत्रिकीसह तयार केले जात आहे, परंतु आवश्यकतेनुसार संभाव्य जागतिक सहकार्याचा पर्याय भारताने खुला ठेवला आहे.