Chandrayaan-2: पृथ्वीची पहिली कक्षा यशस्वीरीत्या ओलांडत 'बाहुबली'ची पुढे वाटचाल; ISRO ने ट्विट करत दिली माहिती
Chandrayaan-2 (Photo Credits: File Image)

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेत बाहुबली ने पृथ्वीची पहिली कक्षा ओलांडत यशस्वीरित्या पुढे प्रस्थान केल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation- ISRO) शास्त्रज्ञांनी दिली आहे. चांद्रयान-2 सुस्थितीत असून योग्य दिशेने पुढे वाटचाल करत असल्याची माहिती काल (मंगळवार, 23 जुलै) इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली होती.

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-2 रॉकेट वेगळे झाल्यानंतर या स्पेसक्राफ्टचे सौर पॅनेल आपोआपच तैनात केले गेले, ज्याचे टेलेमेट्रीचे क्लाउड, ट्रॅकिंग व कमांड नेटवर्कने बंगलोरमध्ये याचे यशस्वीरित्या नियंत्रण घेतले.

इस्त्रो ट्विट:

22 जुलै रोजी भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीरीत्या झेपावलं. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटाच्या इस्त्रोने शक्तिशाली रॉकेट जीएसएलवी-मार्क III-एम1 द्वारे चांद्रयान-2 चे प्रक्षेपण केले. चंद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात येईल. त्यानंतर बाहुबली चंद्राच्या पृष्ठभागावरील लहान सहान अपडेट्स आपल्यापर्यंत पोहचवेल.

पहा व्हिडिओ:

चांद्रयान-2 प्रक्षेपणानंतर 23 दिवस पृथ्वीच्या एका अंडाकार कक्षेत राहील. त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने कूच करेल. त्यानंतर 30 दिवसांनी चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर 42 व्या दिवसापर्यंत चंद्राच्या आजूबाजूला फिरत राहील आणि अखेर 48 व्या दिवशी नियंत्रित गतीने चंद्रावर उतरेल.