भारतात लाँच झाला सर्वात स्वस्त टीव्ही; 32 इंच टीव्ही फक्त 5 हजार 499 रुपये
Samy TV (Photo Credits: Facebook)

टेलिव्हिजन प्रेमींना दिवाळी निमित्त एक खास भेट सामी इन्फोरमॅटिक्स (Samy Informatics) या कंपनीने द्यायचे ठरवले आहे. नुकताच भारतात एक स्मार्ट टीव्ही लाँच करण्यात आला असून हा आजवरचा सर्वात स्वस्त टीव्ही असल्याचा या कंपनीने दावा केला आहे.

हा लाँच करण्यात आलेला नवा स्मार्ट टीव्ही 32 इंचाचा असून त्याची किंमत फक्त 5 हजार 499 रुपये इतकीच आहे. तसेच हा टीव्ही अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

या टीव्हीला नुकतेच दिल्लीतील Constitution Club मध्ये लाँच करण्यात आले आहे. हा टीव्ही भारतात बनवण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

पण हा टीव्ही विकत घ्यायचा प्लॅन तुम्ही करत असाल तर ही माहिती जरूर वाचा

कंपनीने टीव्ही विक्रीसाठी एक नवा फंडा शोधून काढला आहे. ज्या कोणाला हा टीव्ही विकत घ्यायचा असेल त्यांनी याच्या खरेदीची लिंक ओपन करायची. परंतु ही लिंक तुम्हाला सरळ ऍप डाउनलोड करायला सांगते. त्यामुळे हा टीव्ही फक्त कंपनीच्या ऍपद्वारेच खरेदी करता येईल. तसेच या ऍपमध्ये आधार कार्ड नंबर देणं बंधनकारक आहे. आधार नंबरशिवाय हा टीव्ही विकत घेता येणार नाही.