प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

जगातील लोकप्रिय स्मार्टफोन उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) आपला पहिला 5G स्मार्टफोन बाजारात घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिण कोरियामध्ये 5 एप्रिलला कंपनी हा 5G फोन लॉन्च करणार आहे. नुकतीच कंपनीने याबाबतची घोषणा केली आहे. गॅलेक्सी एस10 5G (Galaxy S10 5G) असे या फोनचे नाव असून, कोणत्याही प्री बुकिंगशिवाय हा फोन 5 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन कधी उपलब्ध होईल याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

कोरियन बाजारात या फोनची किंमत 15 लाख वॉन (1332 डॉलर) असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार भारतीय बाजारात या फोनची किंमत अंदाजे 91 हजार 400 रुपये असू शकते.

फोनची वैशिष्ट्ये -

> 6.7 इंच डिस्प्ले

> 3D डेप्थ कॅमेरा

> ट्रिपल कॅमेरा सिस्टम (12 मेगापिक्सल- 77 डिग्री, दूसरा 12 मेगापिक्सल- 45 डिग्री आणि तीसरा 16 मेगापिक्सल- 123 डिग्री अँगल)

> 4500 mAh बॅटरी

> अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट स्कॅनर

> वायरलेस पॉवरशेअर (हेही वाचा: Apple कंपनी भारतात iPhone6 आणि iPhone 6 Pluse ची विक्री बंद करणार)

सोमवारी दक्षिण कोरियाच्या नॅशनल रेडिओ रिसर्च एजन्सीने या फोनच्या सिग्नलची यशस्वी चाचणी घेतली. त्यानंतर या फोनच्या विक्रीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यानंतर अमेरिकेच्या व्हेरिझॉन (Verizon) कंपनीचाही मोटोरोला मोटो झेड 3 हा 5G फोन  बाजारात दाखल होणार आहे.