Apple कंपनी भारतात iPhone6 आणि iPhone 6 Pluse ची विक्री बंद करणार
Apple (Image: PTI)

Apple कंपनीने भारतात आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लसची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत कंपनी छोट्या स्टोर्सला ही बंद करणार असून जे एका महिन्यात 35 पेक्षा अधिक फोनची विक्री करु शकत नाहीत. याबद्दल इंडस्ट्रीच्या तीन सिनियर अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. कंपनी भारतात अॅपल कंपनीची ब्रँन्ड वॅल्यू कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.या दोन फोनची विक्री बंद केल्यानंतर आयफोनची सुरुवाती किंमतीत 5000 रुपयांनी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

2014 मध्ये कंपनीने आयफोन 6 लॉन्च केला होता. त्याच्या 32 GB वेरियंटची किंमत 24,900 रुपये आणि आयफोन 6Sएस ची किंमत 29,900 रुपये आहे. तर डिस्काउंड ब्रँन्डचा टॅग हटवण्यासाठी गेल्या वर्षी आयफोन एसई ची सुरुवाती किंमत 21,000 रुपयांनी वाढवली होती,

आयफोन 6S देशात बनविले जातात परंतु अॅपल कंपनी याची किंमत कमी करणार नसल्याचे सांगितले जाते आहे. तर आयफोनची भारतात विक्रीत घट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.