Samsung Galaxy Tab S7 (Photo Credits-Twitter)

साउथ कोरियन कंपनी सॅमसंग (Samsung) त्यांचा नवा गॅलेक्सी टॅब एस7 (Galaxy Tab S7) लवकरच भारतात लॉन्च करणार आहे. या संदर्भातील खुलासा अॅमेझॉन इंडियाच्या प्रमोशनल पेजच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा टॅब कंपनीने 5 ऑगस्टला लॉन्च केला होता. परंतु भारतात तो अद्याप अधिकृतरित्या उतरवण्यात आलेला नाही. अॅमेझॉनच्या पेजनर याच्या लॉन्चिंग तारखेसंदर्भात सुद्धा अधिक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु यामध्ये Notify Me हा ऑप्शन जरुर दिलेला आहे.(Lenovo Yoga Slim 7i लॅपटॉप भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन)

लॉन्चिंगच्या वेळी याच्या 6GB रॅम+128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 699 युरो (जवळजवळ 62 ,200 रुपये) आणि 8GB रॅम+256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 799 युरो (69,300 रुपये) ठेवण्यात आली होती. याच्या 4G वेरियंटची किंमत क्रमश: 799 युरो (71,000 रुपये) आणि 879 युरो (78,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा तीन रंगात उपलब्ध म्हणजेच मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक ब्रॉन्ज आणि मिस्टिक सिल्वर मध्ये येणार आहे.

अॅन्ड्रॉइड 10 वर काम करणाऱ्या गॅलेक्सी टॅब S7 मध्ये 11 इंचाचा WQXGA LTPS टीएफडी डिस्प्ले मिळणार आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2560X1600 पिक्सल रेजॉल्यूशनसह येणार आहे. टॅबलेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865+ प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतचा स्टोरेज दिला जाणार आहे.(Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. त्यामध्ये 13 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल सेंसर आहे. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. यामध्ये 8000mAh ची मोठी बॅटरी सुद्धा दिली जाणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G (ऑप्शनल), Wifi 6, ब्लूटुथ v5.0 जीपीएस/A-जीपीएस आणि युएसबी टाइप सी-पोर्ट दिला आहे. हा वायरलेस DeX सपोर्टसह येणार असून जो या टॅबला मिनी-डेस्कटॉपमध्ये बदलणार आहे. यासोबत युजर्सला जेस्चर सपोर्ट आणि S Pen सुद्धा मिळणार आहे.