Lenovo Yoga Slim 7i लॅपटॉप भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Lenovo Yoga Slim 7i (Photo Credits-Twitter)

टेक कंपनी लेनोव्हो (Lenovo) यांनी त्यांच्या सर्वात खास Yoga Slim 7i लॅपटॉप भारतात लॉन्च केला आहे. या लॅपटॉपमध्ये इंटेलचे 10th जनरेशनचे दमदार प्रोसेसर आणि 60W ची बॅटरी दिली आहे. या व्यतिरिक्त लॅपटॉपला इंटेलिजेंट कुलिंग फिचर सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. कंपनीने यापूर्वी जुन महिन्यात आईडियापॅड स्लिम 3i लॅपटॉप भारतात लॉन्च केला होता.(Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

Lenovo Yoga Slim 7i ची किंमत 79,990 रुपये आहे. हा लॅपटॉप ग्रे रंगाच्या ऑप्शनसह येणार असून 14 ऑगस्ट पासून ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्टोर मधून खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत कंपनीचा हा लॅपटॉप अधिकृत संकेतस्थळासह ई-कॉमर्स साइट्स अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट येथून खरेदी करण्यासाठी 20 ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्याल यामध्ये प्री-इंस्टॉल्ड विंडो 10 आणि Nvidia GeForce MX350 GDDR5 ग्राफिक कार्ड दिले आहे. त्याचसोबत लॅपटॉपसाठी 16GB रॅम आणि 512GB एसएसडी सपोर्ट मिळणार आहे.

लेनोव्होने या लॅपटॉपसाठी 4.0 वॉल्टचे डॉल्बी एटमॉस स्पीकर्ससह 60W ची बॅटरी सुद्धा दिली आहे. जी रॅपिड चार्ज फिचर लैस आहे. तसेच युजर्सला या लॅपटॉपमध्ये 2X2 AX Wi-Fi 6 आणि Thunderbolt 3 सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपचे वजन 1.3 किलोग्रॅम आहे.(Thomson यांनी भारतात 10,999 रुपये किंमतीत लॉन्च केला Make In India' Android टीव्ही)

कंपनीने लेनोव्हो IdeaPad Slim 3i लॅपटॉप जून महिन्यात लॉन्च केला होता. या लॅपटॉपची सुरुवाती किंमत 26,990 रुपये आहे. हा लॅपटॉप 14 इंच आणि 15 इंच स्क्रिनसह उपलब्ध आहे. फिचर्स बद्दल सांगायचे झाल्यास लेनोव्हो आईडियापॅड 3i Intel 10th जनरेशन प्रोसेसरसह येणार आहे. या व्यतिरिक्त लॅपटॉपमध्ये 12GB पर्यंतचा DDR4 RAM,1TB पर्यंतचा स्टोरेज आणि डॉल्बी ऑडिओ सिस्टिम सपोर्ट मिळणार आहे.