Realme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स
Realme C15 (Photo Credits-Twitter)

रिअलमी येत्या 18 ऑगस्टला त्यांचे दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करणार आहेत. Realme C12 आणि Realme C15 हे स्मार्टफोन दुपारी 12.30 वाजता लॉन्च केले जाणार आहेत. रिअलमी यांच्याकडून मीडिया इनव्हिटेशन सुद्धा पाठवण्यात आले आहे. कंपनीने असे ही म्हटले आहे की, या दोन स्मार्टफोनमध्ये 6000mAh मेगा पॉवर पॅक दिला जाणार आहे. रिअलमी सी15 स्मार्टफोनसह 18W चे फास्ट चार्जर मिळणार असून स्मार्टफोन रिअलमी सी12 साठी 10W चा चार्जर ग्राहकांना दिला जाणार आहे.

रिअलमी सी 12 आणि रिअलमी सी15 स्मार्टफोनसाठी लॉन्चिंगचा इवेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Twitter, Facebook आणि YouTube येथे लाईव्ह पाहता येणार आहे. कंपनीने दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती बाबत अद्याप खुलासा केलेला नाही. तर स्टोरेज ऑप्शन बद्दल बोलायचे झाल्यास रिअलमी सी15 स्मार्टफोन 3GB आणि 64GB स्टोरेज व 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येणार आहेत.(Samsung Galaxy Note 20 आणि Galaxy Note 20 Ultra भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

रिअलमीच्या या दोन स्मार्टफोनसाठी 6.52 इंचाचा HD+IPS LCD डिस्प्लेसह येणार आहे. यासाठी रेज्योल्यूशन 1600/720 पिक्सल असणार आहे. फोनच्या पुढील पॅनलवर वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळणार आहे. तसेच प्रोसेसरसाठी दोन्ही डिवाईसमध्ये Octa Core Media Tek Helio G35 चा वापर केला जाऊ शकतो. रिअलमी सी 15 स्मार्टफोनमध्ये 13MP प्रायमरी लेंस दिली जाणार असून अपॅचेर f/2.2 असणार आहे. सेल्फीसाठी 8MP कॅमेरा दिला जाणार आहे. याचा अपॅचेर f/2.0 असणार आहे. रिअलमी सी12 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये Wifi, ब्लूटुथ V5.0, GPS, GLonass आणि 35mm हेडफोन जॅक मिळणार आहे.