Samsung (Photo Credit: Fortune)

सॅमसंग (Samsung) कंपनीची अपकमिंग Galaxy S21 सीरिज संदर्भात विविध रिपोर्ट समोर आले आहेत. ज्यामुळे याच्या लॉन्चिंग आणि फिचरबद्दल अधिक माहिती मिळाली आहे. त्यानंतर आता एका रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरिज डिवाइस 5G कनेक्टिव्हिटीसह भारतीय बाजारात उतरवला जाणार आहे. कंपनीकडून अद्याप सीरिजच्या लॉन्चिंग, किंमत आणि स्पेसिफिकेशनबद्दल माहिती मिळाली नाही.(Redmi Note 9 5G सिरीज 26 नोव्हेंबर रोजी होणार लॉन्च; जाणून घ्या फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत)

91 मोबाईल रिपोर्टनुसार, ईशान अग्रवाल यांनी असा खुलासा केला आहे की गॅलेक्सी एस21 सीरिजच्या SM-G991B, SM-G996B आणि SM-G998B मॉडेल नंबर असलेला हँडसेट 5G सपोर्टसह भारतात लॉन्च होणार आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती मिळालेली नाही. यापूर्वी कंपनीने Galacy S20 सीरिज 4G सपोर्टसह भारतीय बाजारात उतरवला होता.(Microsoft Surface Go 2 आणि Surface Book 3 टॅबलेट भारतात लाँच, वैशिष्ट्ये ऐकून तुम्हीही व्हाल हैराण)

लीक रिपोर्टनुसार, सॅमसंगचा अपकमिंग गॅलेक्सी एस21 सीरीज बेस मॉडेल एस21 स्मार्टफोन 6.2 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तर गॅलेक्सी एस21+ स्मार्टफोन 6.7 इंचाच्या डिस्प्लेसह येणार आहे. या दोन्ही स्मार्टफोनसाठी Snapdragon 875 किंवा Exynos 2100 प्रोसेसवर दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त युजर्सला दोन्ही हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ही दिला जाणार आहे. तसेच सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरिज नव्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते असे रिपोर्टनुसार म्हटले जात आहे. या सीरिजची किंमत प्रीमियम रेंज मध्ये असू शकते.गॅलेक्सी एस21 सीरिज डिवाइस Phantom Voilet,Pink, White आणि Gray कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करुन दिला जाऊ शकतो.