Samsung Galaxy M51 (Photo Credits: Twitter)

भारतीय बाजारात घट्ट पाय रोवून असलेली स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने (Samsung) आपला नवा स्मार्टफोन Samsung Galaxy M51 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन जर्मनीत लाँच केला आहे. जर्मनीच्या वेबसाइटवर हा लिस्ट करण्यात आला आहे. मात्र हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होईल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरात लवकर तो भारतात लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या स्मार्टफोनची किंमत 360 यूरो (जवळपास 31,400 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. जर्मनीमध्ये हा स्मार्टफोनची प्री ऑर्डर बुकिंग सुरु झाली आहे. 11 सप्टेंबरपासून या स्मार्टफोन उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात 6.7 इंचाची इन्फिनिटी ओ कटआऊट सह फुल एचडी डिस्प्ले+सुपर एम्लोल्ड+डिस्प्ले देण्यात आली आहे. हँडसेटमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच स्टोरेजसाठी 6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने 512GB वाढविले जाऊ शकते.

हेदेखील वाचा- Samsung Galaxy Z Fold 2 फोल्डेबल फोन 1 सप्टेंबरला होऊ शकतो लाँच, काय असतील याची खास वैशिष्ट्ये?

याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, यात 64MP चा प्रायमरी, 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP चा डेप्थ सेंसर आणि 5MP चा मॅक्रो सेंसर दिला गेला आहे. याच्या पुढील बाजूस 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

याच्या बॅटरी विषयी बोलायचे झाले तर यात 7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 25 वॉट फास्ट चार्जिंग स्पीड सपोर्ट करते. यात 4G LTE सपोर्ट, ड्यूल सिम, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि एक साउंड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळतो.