Samsung Galaxy M10 and M20 (Photo Credit- Twitter)

नवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. सॅमसंगने सॅमसंग गॅलक्सी एम10 (Samsung Galaxy M10) आणि एम 20 (M20) हे स्मार्टफोन बाजारात सादर केले आहेत. फोनची निर्मिती, लूक डिझाईन करताना तरुणाईचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसारच यात फिचर्स देण्यात आले आहेत. (Jio ने लॉन्च केले JioRail App, रेल्वे तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या)

फिचर्स

सॅमसंग गॅलक्सी एम10 आणि एम 20 मध्ये इनफिनिटी व्ही डिस्प्ले पॅनल (Infinity V display panel) आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात फेस अनलॉक फिचर देखील आहे. तसंच 5,000 एमएएच बॅटरीही देण्यात आली आहे.

विक्रीस उपलब्ध

गॅलक्सी एम10 आणि एम20 ची विक्री 5 फेब्रुवारीपासून अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंग इंडिया ई-स्टोरवर सुरु होईल.

सॅमसंग गॅलक्सी एम10 आणि एम20 स्पेसिफिकेशन

M10 हा ड्युअल सिम स्मार्टफोन अॅनरॉईड 8.1 ओरिओवर आधारीत सॅमसंग एक्सपीरियन्स 9.5 वर चालेल. यात 6,22 इंचाचा एचडी+(720x1520 पिक्सल) टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशो 19.5:9 इतका आहे.

रॅम आणि स्टोरेजवर आधारीत या फोनचे दोन वेरिएंट आहेत- 2 जीबी रॅमसह 16 जीबी स्टोरेज आणि 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज.

हे दोन्ही वेरिएंटमध्ये मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट करेल. यात दोन रिअर कॅमेरे आहेत. प्रायमरी सेंसर 13 मेगापिक्सल (एफ/ 1.9 अपर्चर) चा आहे. तर 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईल्ड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याचा अपर्चर एफ/ 2.2 आहे. तर सेल्फीसाठी एफ/ 2.0 अपर्चर 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

याशिवाय एम20 मध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी+(1080X2340 पिक्सल) टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशो 19.5:9 आहे. याचे दोन वेरिएंट आहेत- 3 जीबी रॅमसह 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेज.

यात ड्युअ्ल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. एक एफ/ 1.9 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आहे. यासोबतच एफ/ 2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईल्ड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीप्रेमींसाठी एफ/ 2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत 

एम10 आणि एम20 च्या किंमती सामान्यांच्या बजेटचा विचार करुनच ठरवण्यात आल्या आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एम10 ची किंमत 7990 रुपयांपासून सुरु होईल. या किंमतीत तुम्हाला 2 जीबी रॅम/ 16 जीबी स्टोरेज वेरिएंट मिळेल. तर 3 जीबी रॅम/ 32 जीबी स्टोरेज मॉडलची किंमत 8,990 रुपये आहे. एम20 च्या 3 जीबी रॅम/ 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,990 रुपये आहे. तर एम20 का 4 जीबी रॅम/ 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,990 रुपये आहे.