Coronavirus Lockdown काळात रिलायन्स जिओची 'Recharge at ATM' सुविधा; ATM द्वारे रिचार्ज करण्यासाठी सोप्या स्टेप्स
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन (Lockdown) मुळे प्रीपेड धारकांना रिचार्ज करणे कठीण होत असेल. त्यामुळे प्रीपेड युजर्संना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असेल. लॉकडाऊन काळात जिओच्या प्रीपेड युजर्सची होणारी गैरसोय लक्षात घेऊन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) एक विशेष सुविधा सुरु केली आहे. त्यामुळे प्रीपेड युजर्स आता देशातील कोणत्याही ATM द्वारे मोबाईलमध्ये रिचार्ज करु शकतात. यासाठी रिलायन्स कंपनीने देशातील सर्व मोठ्या बँकांशी हातमिळवणी केली आहे.

ATM द्वारे मोबाईलमध्ये रिचार्ज करण्याची सुविधा एक्सिस बँक (Axis Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), एचडीएफसी बँक (HDFC Bank), डिसीबी बँक (DCB Bank), एयुएफ बँक (AUF Bank), सिटी बँक (CitiBank) आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक (Standard Chartered Bank) या बँकांच्या ATM मध्ये उपलब्ध आहे. देशात असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असल्याने युजर्सची गैरसोय टाळण्यासाठी रिलायन्स जिओने हे पाऊल उचलले आहे.

तुमच्या जवळच्या ATM द्वारे जिओ नंबर रिचार्ज करण्यासाठी सोप्या स्टेप्स:

# तुमचे कार्ड मशिनमध्ये इन्सर्ट करा.

# तुमचा रिचार्ज ऑप्शन मेन्यू मधून सिलेक्ट करा.

# तुमचा मोबाईल नंबर टाका.

# त्यानंतर तुमचा पिन नंबर इन्टर करा.

# कितीचा रिचार्ज करायचा ती रक्कम टाका.

# Confirm केल्यानंतर इन्टर करा.

# ATM मशिनच्या स्क्रिनवर रिचार्ज मेसेज दिसेल. आणि तुमच्या अकाऊंटमधून रिचार्जची रक्कम डेबिट होईल. त्यानंतर तुम्हाला जिओ कडून रिचार्ज मेसेज येईल.

रिलायन्स जिओने मोबाईल नंबर रिचार्ज करण्यासाठी अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्याय युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र ते वापरणे शक्य नसल्यास आणि ATM चा पर्याय तुमच्या सोयीचा असल्यास तुम्ही एटीएम द्वारे रिचार्ज करु शकता.

काही दिवसांपूर्वीच जिओने लॉकडाऊनमुळे घरुन काम करणाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम प्लॅन लॉन्च केला होता. 251 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 102 GB डेटा 51 दिवसांसाठी दिला जात आहे. मात्र यात व्हॉईस कॉलिंग किंवा मेसेजची सुविधा नाही.