Representational Image (Photo Credit: File Photo)

भारतात येत्या काही दिवसात शानदार स्मार्टफोन लॉन्च केले जाणार आहेत. यामध्ये सॅमसंग, रेडमी आणि ओप्पो सारख्या ब्रँन्डच्या स्मार्टफोनचा समावेस आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये मोठ्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या आपले प्रीमियम फोन लॉन्च करणार आहेत. तसेच शाओमीकडून सुद्धा एक मेगा इवेंटचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये स्मार्टफोन, टीव्ही, आणि स्मार्ट बँन्डसह अन्य काही धमाकेदार प्रोडक्ट्सचा समावेश असणार आहे.

Oppo Reno 7 Series अंतर्गत चार स्मार्टफोन ओप्पो रेनो 7 5G, ओप्पो रेनो 7 प्रो, ओप्पो रेने 7 प्रो 5G आणि ओप्पो रेनो 7 एसई 5G लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. ओप्पो Reno7 SE हा चीनमध्ये 6.43 इंचाचा एमोलेड फुल एचडी डिस्प्लेसह येणार आहे. यामध्ये 90HZ रिफ्रेस्ड रेट सपोर्ट दिला जाणार हे. फोन इन-स्क्रिन फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्टसह येणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. तर फोनच्या रियर पॅनलवर 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळणार आहे. या व्यतिरिक्त 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स दिली जाणार आहे. फोन Dimensity 900 चिपसेट सपोर्टसह येऊ शकतो. फोन अॅन्ड्रॉइड11 आधारित ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळणार आहे. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे.

कंपनीने कंन्फर्म केले आहे की, Redmi Note 11S स्मार्टफोन मध्ये 108MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिलणार आहे. फोन एमोलेड डिस्प्लेसह येणार आहे. तसेच फोनमध्ये 5जी ऐवजी 4जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. रेडमी नोट11S स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल ISOCELL HM2  सेंसर दिला जाऊ शकतो. फोन 8 मेगापिक्सल Sony IMX355 सेंसर आणि 2 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स सपोर्टसह येणार आहे. या व्यतिरिक्त 2 मेगापिक्सलच डेप्थ सेंसर ही मिळणार आहे. फोन MediaTek चिपसेटसह येणार आहे. फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 11 आधारिरत MIUI 13 वर काम करणार आहे. (Google Invest in Bharti Airtel: गुगल करणार एअरटेलमध्ये 100 कोटी डॉलरची गुंतवणूक, स्वस्त स्मार्टफोन करणार तयार)

Samsung Galaxy S22 Series  अल्ट्रामध्ये 6.8 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. फोन Exynos 2200 SoC किंवा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटसह येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस22 अल्ट्रासाठी 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजचा दिला जाणार आहे. 8जीबी आणि 12 जीबी रॅमचा सुद्धा ऑप्शन असणार आहे. फोन 5,000mAh ची बॅटरीसह येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस22 कॅमेऱ्यामध्ये अल्ट्रा 12 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 108 मेगापिक्सल वाइड अँगल शूटर, 10 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्ससह 3X ऑप्टिकल झूम ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन मिळणार आहे. तर दुसरा 10 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स 10X झून आणि OIS सह येणार आहे. गॅलेक्सी S22 अल्ट्राच्या 40 मेगापिक्सल सेल्फी स्नॅपरसह येणार असल्याची चर्चा आहे.