भारतात लोकप्रिय असलेला शाओमी कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस (Redmi Note 10s) येत्या 13 तारखेला भारतात लॉन्च होणार आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स अमेझॉनवर (Amazon) लीक झाले आहेत. भारतात रेडमी नोट 10 सीरिज मार्च महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. या सीरिजमध्ये रेडमी नोट 10 (Redmi Note 10), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro), रेडमी नोट प्रो मॅक्स (Redmi Note Pro Max) हे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. रेडमी नोट 10 एस या सीरिजचा लेटेस्ट मॉडेल असणार आहे. या धमाकेदार स्मार्टफोनचे वैशिष्ट समोर आले आहेत. रेडमी नोट 10 चा ट्विक्ड व्हर्जन असू शकतो.
भारतात रेडमी नोट 10 एस येत्या 13 मे ला दुपारी 12 वाजता लॉन्च केले जाणार आहे. अमेझॉन वेबसाईटवर या अपकमिंग स्मार्टफोनसाठी पेज जारी केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर याच पेजवरून विक्री केली जाणार आहे. तसेच या पेजवर या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले जात आहे. हे देखील वाचा- Xiaomi च्या फोल्डेबल स्मार्टफोन J18s चे स्पेसिफिकेशन झाले लीक; 108MP इन-डिस्प्ले कॅमऱ्यासह मिळतील 'हे' खास फीचर
या स्मार्टफोनमध्ये मिडिया टेक हेलिओ जी95 असणार आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे. तर, 5 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अमेझॉनवर भेट देऊ शकतात.