Redmi 9 Prime वर दिली जातेय दमदार सूट, जाणून घ्या नव्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Xiaomi Redmi 9 Prime (Photo Credits: Twitter)

Redmi 9 Prime स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कारण या स्मार्टफोनवर दमदार सूट दिली जात असून त्याचा लाभ घेता येणार आहे. रेडमी 9 प्राइम मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरीसह पॉवरफुल प्रोसेसर ही दिला गेला आहे. मुख्य गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनची किंमत कमी केली असून आता तो नव्या किंमतीमध्ये खरेदी करता येणार आहे. नव्या किंमतीसह कंपनीने हा स्मार्टफोन अधिकृत वेबसाइटवर ही लिस्ट करण्यात आला आहे.(Xiaomi चा 108MP चा कॅमेरा असलेला Mi 10i 5G स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, काय असू शकते किंमत?)

रेडमीचा 9 प्राइम स्मार्टफोन खरेदी करणार असेल तर हिच उत्तम संधी आहे. कारण नव्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास 4GB+64GB स्टोरेज असलेल्या वेरियंटची किंमत 9,999 रुपये असून 6GB+128GB ची किंमत 10,999 रुपये ठेवली गेली आहे. त्याचसोबत कंपनीने हे सुद्धा सांगितले आहे की, किंमतीत घट की मर्यादित कालावधीपुर्तीच असणार आहे. युजर्सला रेडमी 9 स्मार्टफोन मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराइज कलरमध्ये खरेदी करता येणार आहे.

भारतीय बाजारात हा स्मार्टफोन दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दिला गेलेला स्टोरेज मायक्रोएसडीच्या मदतीने वाढवता येणार आहे. यामध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. अॅन्ड्रॉइड 10 OS वर आधारित हा स्मार्टफोन MediaTek Helio G80 प्रोसेसरवर काम करणार आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 5020mAh ची बॅटरी दिली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये युजर्सला एआय क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा आहे. तर 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5MP चा मायक्रो शूटर आणि 2MP चा डेप्थ सेंसर ही दिला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.